Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: दक्षिण गोव्‍यातील खूनप्रकरणात 62 टक्‍क्‍यांची घट

Goa Crime News: अधीक्षक अभिषेक धनिया: यंदा 9 खून तर 10 खुनाचे प्रयत्‍न

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: दक्षिण गोव्‍यात यंदा एकंदर गुन्‍ह्यांचे प्रमाण 28.42 टक्‍क्‍यांनी खाली उतरले असून खुनाच्‍या प्रकरणात 62.5 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. गंभीर गुन्‍ह्यात पोलिसांनी केलेल्‍या तपासाची टक्‍केवारीही 100 टक्‍के असून मागच्‍यावर्षीच्‍या तुलनेत यंदाचे चित्र दिलासादायक असल्‍याचे मत दक्षिण गोव्‍याचे पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी व्‍यक्‍त केले.

1 जानेवारी ते 17 डिसेंबरपर्यंतच्‍या गुन्‍ह्यांची यादी धनिया यांनी आज प्रसारित केली. अन्‍य गुन्‍ह्यांमध्‍ये यंदा सदोष मनुष्‍य वधाच्‍या तीन, दिवसा घरफोडीच्‍या 9, रात्री घरफोडीच्‍या 38, अन्‍य चोऱ्यांच्या 72 तर सोनसाखळ्‍या पळविण्‍याच्‍या दहा घटनांची नोंद झाली आहे. फसवणुकीचे 35 गुन्‍हे नोंद झाले आहेत तर दंगलीच्‍या 17 घटना नोंद झाल्‍या आहेत.

मागील वर्षी...

मागच्‍यावर्षी दक्षिण गोव्‍यात 1,073 गुन्‍ह्यांची नोंद झाली होती. यंदा हे प्रमाण 768 एवढे आहे. मागच्‍यावर्षी खुनांची संख्‍या 24 होती. तर यंदा ती 9 वर आहे. याशिवाय यंदा खुनाचे प्रयत्‍न करण्‍याच्‍या दहा, बलात्‍काराच्‍या 34 तर एका जबरी चोरीची नोंद झाली आहे. यातील सर्व प्रकरणांचा पोलिसांनी तपास लावलेला आहे, असे त्‍यांनी सांगितले.

86 जीवघेणे अपघात : रस्‍ता अपघाताच्‍या संख्‍येतही यंदा बरीच घट दिसत असून मागच्‍या वर्षी दक्षिण गोव्‍यात रस्‍त्‍यावर 92 जीवघेणे अपघात घडले होते. यंदा हे प्रमाण 86 आहे. इतर अपघातांची संख्‍या मागच्‍या वर्षी 154 होती. यंदा ती 132 आहे. जिल्‍ह्यातील सायबर गुन्‍ह्यावर नियंत्रण असावे यासाठी लोकांमध्‍ये जागृती करण्‍याची 28 शिबिरे यंदा दक्षिण गोव्‍यात आयोजीत केली असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT