Illegal Tax Collection Gomantak Digital Team
गोवा

Illegal Sopo Tax Collection: सोपो’चौकशी अटळ, पर्यवेक्षकांचे धाबे दणाणले

महापौर राहिलेल्या रोहित मोन्सेरात यांचीही चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मार्केट परिसरात पहाटेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत बसणाऱ्या विक्रेत्यांकडून विना पावती सोपो कर आकारल्याप्रकरणी आयुक्त क्लेन मदेरा यांनी चौकशी समिती नेमली आहे. चौकशी होणार असल्याने मार्केटमध्ये कार्यरत पर्यवक्षेकांचे (सुपरवायझर) धाबे दणाणले आहे.

सुपरवायझरच्या अधिपत्याखाली कंत्राटी कामगार विक्रेत्यांकडून सोपो कर वसुली करत असतात. परंतु सोपो वसूल केल्यानंतर त्या विक्रेत्यांना पावती दिली जात नाही, याचा व्हिडिओ नगरसेवक उदय मडकईकर यांनी चित्रीत करून तो व्हायरल केला. त्यामुळे विना पावती सोपो कर आकारणी हा मोठा घोटाळा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

या प्रकरणाची दखल अखेर महापौर आणि आयुक्तांनी घेतली. आयुक्त मदेरा यांनी तत्काळ याप्रकरणी संबंधित सुपरवायझरला बोलावून कारणे दाखवा नोटीस बजावली. शिवाय त्याच्या प्रथम जबाबात हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे बाहेर आल्यामुळे हा महाघोटाळा असावा, असा निष्कर्ष आयुक्तांनी नोंदविला. त्याशिवाय कर संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले असून, आता सुपरवायझर यांच्यावर चौकशीची कुऱ्हाड कोसळणार, हे निश्‍चित आहे.

आयुक्तांनी तीन सदस्यीय समिती नेमली असून, आत्तापर्यंत म्हणजे महापौर राहिलेल्या सुरेंद्र फुर्तादो, यतिन पारेख, शुभम चोडणकर, वैदही नाईक, विठ्ठल चोपडकेर, उदय मडकईकर आणि विद्यमान रोहित मोन्सेरात यांच्यापर्यंतची चौकशी होणे अपेक्षित आहे.

मनपाच्या शुक्रवारच्या बैठकीतही मडकईकर यांनी मागील वर्षी आणि आत्ताचे तीन महिने महापौर राहिलेल्या रोहित मोन्सेरात यांचीही चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यांच्या लक्षात हा मुद्दा का आला नाही, असा प्रश्‍न त्यांनी केला होता. त्यामुळे आता नेमलेली समिती चौकशीसाठी कोणा-कोणाला बोलावणार हे लवकरच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral: महाराष्ट्र पोरका झाला! 'अजित दादा' अनंतात विलीन; मुख्यमंत्री सावंतांनी साश्रू नयनांनी वाहिली श्रद्धांजली

Shocking News: क्रिकेटविश्वात खळबळ! दिल्लीच्या खेळाडूंकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड

Goa Liquor Smuggling: महसूल बुडवला, बनावट बिलं बनवली! 1 कोटींच्या बनावट दारु तस्करीचा मास्टरमाइंड जेरबंद; सांगलीच्या शैलेश जाधवला अटक

Goa Water Issue: पर्यटन नगरीत जलसंकटाची चाहूल; राज्यातील 59% जलस्रोत प्रदूषित तर 39 तलाव 'सर्वात खराब' श्रेणीत

श्वास कोंडणाऱ्या 'त्या' घटनेचा हिशोब होणार! कुंकळ्ळी अमोनिया गळतीप्रकरणी सुनावणी सुरु होणार; औद्योगिक सुरक्षेशी खेळणाऱ्यांना दणका

SCROLL FOR NEXT