Goa Government|Sonsodo Garbage Dainik Gomantak
गोवा

Goa Government: सोनसोडो कचरा विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर; सरकारकडे 14 कोटी रुपयांचा प्रस्ताव पडून

मडगाव पालिका : सोनसोडो कचरा विल्हेवाटीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: सोनसोडो कचरा विल्हेवाटीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला असून मडगाव नगरपालिकेने त्यासाठी 14 कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामाचा प्रस्ताव सरकारपुढे सादर केल्याचे कळते. ही रक्कम मंजूर करुन घेण्यासाठी मडगावचे कॉंग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात सामिल झालेले आमदार दिगंबर कामत प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.

सोनसोडो कचरा विल्हेवाटीच्या प्रश्र्नावर चर्चा कामत यांच्या निवास्थानी गोवा कचरा व्यवस्थापन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लेविन्सन मार्टीन्स, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मुख्याधिकारी मानुएल बार्रेटो यांच्यात बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नगरपालिकेचे कचरा विल्हेवाट संदर्भातील अऩेक प्रस्ताव सरकार दरबारी मंजुरीसाठी प्रलंबित आहेत असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामध्ये दैनंदीन ओला कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी खाजगी कंत्राटदाराची नियुक्ती, कचरा सोनसो़डो कचरा प्रकल्पांमध्ये ने-आण करण्याच्या वाहनांसाठी जोड रस्ते तयार करणे व कचरा शेडची दुरुस्ती व देखभाल याचा समावेश आहे. गोवा कचरा व्यवस्थापन मंडळाने शेडची दुरुस्ती व जोड रस्त्यासाठीच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करुन ते मंजुरीसाठी सरकारकडे पाठविल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जागा नसल्याने चिंता

सध्या शेडमध्ये कचऱ्याचे ढीग साचत असून कचरा फेकण्यासाठी जागा नसल्याने चिंता वाढली आहे. या सर्व उपायांबद्दल आपण नगर विकास मंत्र्यांशी बोलू, असे आश्र्वासन आमदार कामत यांनी या बैठकीत दिले.

नियोजनबद्धरित्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येईल तसेच कचऱ्यांखालून जे घाणेरडे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे, त्याचा ताबडतोब बंदोस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

सॅनिटरी कचऱ्याचाही प्रश्र्न उपस्थित

सोनसोडो येथे जो सॅनिटरी (वैद्यकीय) कचरा टाकण्यात आलेला आहे. त्याचीसुद्धा विल्हेवाट लावण्यास मडगाव नगरपालिकेला अपयश आल्याचे कळते. हा कचरा एरव्ही कुंडई (फोंडा) येथील प्रकल्पात वैज्ञानिक प्रक्रियेसाठी पाठविणे अपरिहार्य होते. पण नगरपालिकेने तसे केले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda House Fire: नानोड्यात घराला आग; लग्न सोहळ्यासाठी ठेवलेले अडीच लाख रुपये भस्मसात, 10 लाखांच्या मालमत्तेची हानी

Goa Politics: मनोज परब यांच्‍यामुळेच युती झाली नाही! काँग्रेस–फॉरवर्ड युतीला जनता स्‍वीकारणार - माणिकराव ठाकरे

ZP ELection 2025: प्रचाराचा आज अखेरचा दिवस, भाजप, काँग्रेसच्‍या दिग्गजांकडून 'पायाला भिंगरी'

Goa Road Accident: 16 दिवसांत 14 रस्ताबळी, यंदा आतापर्यंत रस्‍त्‍यांवरील अपघातात 249 ठार

Goa Nightclub Fire: प्रकृती इतकी गंभीर होती तर विदेशात पळून का गेलात? लुथरांविरोधात सरकारी वकिलांचा युक्तिवाद

SCROLL FOR NEXT