Canacona: पोर्तुगीजकालीन काणकोण पालिका उद्यानाला गतवैभव प्राप्त होणार

पोर्तुगीजकालीन काणकोण पालिका उद्यानाचा विकास करण्याची जबाबदारी वनखात्याने घेतली आहे.
Goa News |Canacona
Goa News |CanaconaDainik Gomantak
Published on
Updated on

Canacona: पोर्तुगीजकालीन काणकोण पालिका उद्यानाचा विकास करण्याची जबाबदारी वनखात्याने घेतली आहे. नगराध्यक्ष व चावडी वार्डाचे नगरसेवक रमाकांत नाईक गावकर यांनी या उद्यानाचा विकास करण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे या उद्यानाला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे.

चावडी वार्डाच्या मध्यभागी असलेल्या या एकमेव उद्यानाकडे गेली अनेक वर्षे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते, पण नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी उद्यानाचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

चावडीवरील जुने बसस्थानक याच उद्यानाला खेटून होते. संध्याकाळी उद्यानातील लाऊडस्पीकरवरून गोवा आकाशवाणीच्या बातम्या तसेच सुमधुर गीतांची मेजवानी बसस्थानक व उद्यानात विरंगुळ्यासाठी बसलेल्या लहान थोरांना मिळत होती. तो काळ असा होता की सर्वांच्या घरी रेडिओ नव्हता त्यामुळे ताज्या बातम्या ऐकण्यासाठी नागरिक संध्याकाळी उद्यानात येत होते. गोवा मुक्तीनंतर ही सोय उपलब्ध करण्यात आली होती.

Goa News |Canacona
Mahadayi Water Dispute: 'सेव्ह म्हादई सेव्ह गोवा' फ्रंटच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

यापूर्वी राजबाग-तारीर येथील द ललित हॉटेलतर्फे या उद्यानाचा विकास व देखभाल करण्यात येत होती. या उद्यानात पोर्तुगीजांनी उद्यानाला बारमाही पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरीची निर्मिती केली होती. मात्र गेल्या तीस वर्षात या विहिरीला कचराकुड्यांची अवस्था प्राप्त झाली होती. त्या विहीरीला वनखात्यातर्फे गतवैभव प्राप्त करून देण्यात येणार आहे.

1958 मध्ये उद्यानाची निर्मिती

पोर्तुगीजांनी गोवा मुक्तीपूर्वी सुमारे 1958 मध्ये या उद्यानाची निर्मिती केली होती. मात्र गोवा मुक्तीनंतर स्थापन झालेल्या चावडी नगरपालिकेने या उद्यानात वेगवेगळ्या सोयी उपलब्ध केल्या. त्यामध्ये संध्याकाळी आकाशवाणीचे बातमी पत्र व अन्य कार्यक्रमांचे प्रसारण पालिकेतर्फे करण्यात येत होते.

त्यावेळी करमणुकीच्या अन्य साधनांचा अभाव असल्याने मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक व अन्य या उद्यानात येऊन बसत होते. मात्र त्यानंतरच्या काळात हे सर्व बंद झाले, अशी माहिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी दिली.

Goa News |Canacona
Goa News: ग्रीन टॅक्स, अन्य करांमुळे ट्रकमालक वैतारले

वनखात्यातर्फे उद्यानाचा विकास करण्याबरोबरच उद्यानातील जुन्या घसरगुंडी व झोपाळे काढून त्याजागी नवीन बसविण्यात येणार आहेत. वनखात्याने एक तरी उद्यानाचा विकास करावा अशी सूचना वनमंत्री विश्वजीत राणे यांनी वनखात्याला केली आहे. काणकोण चावडी उद्यानाचा विकास केपे रेंजचे सुहास नाईक यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. - रमाकांत नाईक, नगराध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com