Sonsodo Project Dainik Gomantak
गोवा

सोनसोडो रस्त्याची पावसामुळे दुरवस्था

कचरावाहू ट्रक या रस्त्यावरून नेणे चालक आणि कामगार यांच्यासाठी जोखमीचे

दैनिक गोमन्तक

मडगाव : मान्सूनमुळे सुरू झालेल्या पावसामुळे सोनसोडो कचरा प्रकल्पाकडे जाणारा कच्चा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कचरावाहू ट्रक या रस्त्यावरून नेणे चालक व कामगार यांच्यासाठी जोखमीचे ठरत आहे.

या रस्त्याच्या कामाची फाईल अंतिम म्हणजे वर्क ऑर्डर नेण्याच्या टप्प्यात गहाळ झाल्यानंतर पालिकेने तसे जाहीर केले व ती निविदाही रद्द केली होती. पण, ह्या रस्त्याच्या दुरुस्तीची कोणतीच तजवीज केली नाही व त्यामुळे हा प्रसंग ओढवला आहे. गतवर्षी पावसाळ्यात मुसळधार पावसानंतर रस्ता निसरडा बनला व त्यावरुन ट्रक नेणे अशक्य बनले होते.

त्यानंतर सोनसोडोच्या रस्त्याचे काम व डांबरीकरण करणे असा चाळीस लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करून नंतर निविदा मागविल्या गेल्या होत्या. निविदा स्वीकारुन वर्क ऑर्डर देण्याच्या टप्प्यात असताना ही फाईल गहाळ झाली व सर्व प्रक्रिया अडली. फाईलचा पत्ता लागला नसल्याने अखेर फाईल गहाळ घोषित करून ती निविदाच रद्द केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT