Komunidad building Dainik Gomantak
गोवा

‘सोनसोडो’ समस्‍येवर आज निघणार उपाय!

राणे, मोन्‍सेरात यांचा दौरा: नगरपालिका, कोमुनिदाद इमारतीकडे लक्ष देण्‍याची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव: वारसास्‍थळ असूनही सध्या दुर्लक्षित राहिलेली आणि गेली कित्येक वर्षे रंगरंगोटीच्‍या प्रतीक्षेत असलेली मडगाव नगरपालिकेची तसेच कोमुनिदादच्‍या इमारतीकडे उद्या मंगळवार दि. 26 रोजी सोनसोडो कचरा समस्‍येवर तोडगा काढण्यासाठी येणारे नगरविकासमंत्री विश्वजीत राणे आणि महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात यांनी लक्ष द्यावे अशी मडगावकारांची मागणी आहे.

खरे तर एक वारसास्‍थळ म्हणून जिचे जतन करण्याची गरज आहे त्या नगरपालिका इमारतीची दुर्दशा झाली आहे. या पालिकेची महसुलाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेची आर्थिक स्थिती एवढी कमकुवत झाली आहे की कित्येकदा कर्मचाऱ्यांना पगार कसा घालावा ही चिंता मुख्याधिकाऱ्यांना ग्रासत असते. या सर्व गोष्टी जागेवर घालण्यासाठी मंत्री राणे यांनी लक्ष देण्याची गरज मडगाव येथील दीपक कामत यांनी व्यक्त केली.

मागची कित्येक वर्षे लोंबकळत पडलेला मडगाव कब्रस्थानच्या प्रश्नावरही मंत्री राणे यांनी तोडगा काढावा अशी आमची अपेक्षा आहे असे मत येथील रियाझ शेख यांनी व्यक्त केली. शेख म्हणाले, राणे हे नगरनियोजनमंत्रीही आहेत. या कब्रस्थान विषयावरून आम्हा मुस्लिमांना गेली कित्येक वर्षे झुलवत ठेवले गेले. निदान आता तरी आम्हाला न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे.

मडगावात वाहने पार्किंग करण्यासाठी जागा नाही. मडगाव पालिकेने जो बहुमजली पार्किंग तळ उभारण्याचा निर्णय घेतला होता, तोही सध्या लोंबकळत पडला आहे. मंत्र्यांनी ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नगरसेवक महेश आमोणकर यांनी व्यक्त केली.

महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात यांच्याकडूनही आम्हाला अपेक्षा आहेत. मडगावची कोमुनिदाद इमारत मोडकळीस आली असून तिची ताबडतोब दुरुस्ती हाती घेण्याची गरज आहे. शिवाय या कोमुनिदाद कार्यालयातील दस्तावेज सांभाळून ठेवण्यासाठी उपाययोजना हाती घेण्याची गरज पॉल फर्नांडिस यांनी व्‍यक्त केली. तर, कोमुनिदाद कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार स्थगित आहे. त्यावर मंत्र्यांनी तोडगा काढावा अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT