Sonsodo Garbage Issue : सोनसोडो कचरा प्रकल्पाचा प्रश्र्न परत एकदा उफाळून आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आश्र्विन चंद्रू यांनी सोनसोडो प्रकल्पाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
जिल्हाधिकारी कचेरीचा पाहणीनंतरचा अहवाल आता न्यायालयाला सादर केला आहे. या अहवालात नेमके काय असेल याचे कुतूहल सर्वांनाच लागले आहे. यापूर्वी न्यायालयाने सोनसोडोतील कचऱ्यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिका विचारात घेऊन नगरपालिकेला अनेक निर्देश दिले होते. पण नगरपालिका ते पूर्ण करू शकली नाही, असा कयास आहे.
न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्याचे पूर्ण पालन करण्यात आले आहे. त्याबद्दल कोणतीही समस्या नाही. प्रश्र्न आहे तो आधीपासून जो साचलेला कचरा आहे त्याची विल्हेवाट लावण्याचा, असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले.
त्यासंदर्भातही नगरपालिकेची उपाययोजना चालू आहे. हा कचरा उचलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. साळगाव प्रकल्पात दररोज २० टन कचरा पाठवला जातो, असेही नगराध्यक्षांनी सांगितले.
नगरपालिकेने याआधी न्यायालयाकडे आधीचा साचलेला कचरा उचलण्यास वेळ मागून घेतली होती. नवीन रस्ता करणे, गटारबांधणी करणे, कचरा अडविण्यास संरक्षक भिंत बांधणे यासाठीही नगरपालिकेने वेळ मागितली होती.
सोनसोडो कचरा प्रश्र्न नगरपालिकेला डोकेदुखी ठरत आहे. इथे दररोज १० मेट्रीक टन कचरा आणून टाकला जातो. पूर्वीचा दहा हजार मेट्रीक टन कचरा आहे तसाच आहे. शिवाय बेलिंग मशीन मोडल्याने ३०० ते ४०० टन सुका कचरा प्रक्रियेविना साठत असतो, असे दिसून आले आहे.
‘आरडीएफ’चा जो मोठा डोंगर झाला होता तो बऱ्याच अंशी कमी झाला आहे. कर्नाटकातील सिमेंट कंपनी हा कचरा उचलत आहे. आरडीएफ संपण्याच्या परिस्थितीत आहे. चतुर्थीनंतर येथील संपूर्ण आरडीएफ कचरा उचलला जाईल.
दामोदर शिरोडकर, नगराध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.