Sonsodo Fire  Dainik Gomantak
गोवा

वारंवार आगीच्या घटना तरीही सोनसोडोवर आगरोधक उपाय नाहीत

जिल्हाधिकाऱ्यांकडून मडगाव नगरपालिकेला पुन्हा एकदा तंबी

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : मडगाव नगरपालिकेच्या सोनसोडो कचरा यार्डात दोनदा आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला तेथे आगरोधक उपाय घेण्याची सूचना करुनही पालिकेने कोणतेच उपाय न योजल्याने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला धारेवर धरत तंबी दिली आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी ही नोटिस पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठवली आहे.

2019 आणि नंतर 2022 मध्ये अशा दोनदा या घटना घडल्या होत्या. पहिल्या वेळची आग महिनाभर धुमसत होती आणि त्यावेळचे धुराचे लोट व अन्य कारणाने प्रदूषणाची मोठी हानी झाल्याचे कारण सांगत प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला 1 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. या कारवाईला मडगाव पालिकेने आव्हानही दिले होते. त्यानंतर यंदा मार्च महिन्यात आगीची दुसरी घटना घडली होती. त्यात सोनसोडोवरील विद्युत यंत्रणा आणि उपकरणे खाक झाली होती.

त्यानंतर सततच्या आगीच्या घटनांची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला विविध उपाय सुचविले होते आणि त्यांची त्वरित अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. त्यात सोनसोडोवर आगरोधक उपाय घेणे, पाण्याची टाकी बांधणे, मोटर व अन्य उपकरणे उपलब्ध करणे, त्यासाठी लागणारे कर्मचारी नियुक्त करुन त्यांना प्रशिक्षण देणे, आदी गोष्टींचा समावेश होता. पण पालिकेच्या बाजूने प्रत्यक्षात काहीच झाले नसल्याची बाब लक्षात आणून दिल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ही तंबी दिली आहे. मंडळाच्या सूचनेप्रमाणे पालिकेने तेथे बसवण्यासाठी मोटरपंप आणलेला असला तरी अजून तो बसविलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT