Sonarbaag locals oppose bandhara Dainik Gomantak
गोवा

Bandhara On Khandepar River : म्हादईचे पात्र कोरडे पडल्‍यानंतर जाग आली का? बंधारा नकोच!

सोनारबागवासीय आक्रमक : ‘खांडेपार’वरील प्रकल्पाला जोरदार विरोध : पोलिस बंदोबस्तात सभा आटोपली

दैनिक गोमन्तक डिजिटल

जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीचे पाणी कर्नाटकात का वळू दिले, असा सवाल करीत कोणत्याही परिस्थितीत खांडेपार नदीवर बंधारा नकोच, अशी भूमिका आज सोनारबागवासीयांनी घेतली.

लोकांनी तीव्र विरोध दर्शविल्याने अखेर ही सभा पोलिस बंदोबस्तात आटोपली. मागच्या वेळेला खांडेपार नदीला महापूर आल्यानंतर आमची काय स्थिती झाली ती आम्हालाच ठाऊक आहे, अशा परिस्थितीत बंधारा बांधून आणखी धोका पत्करायचा नाही, असेही ग्रामस्थांनी सांगितले आणि सरकारी अधिकारी निरुत्तर झाले.

सोनारबाग रहिवाशांची आज सकाळी उसगाव पंचायत सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत खांडेपार नदीत सोनारबाग ते मुर्डीपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याच्या आराखड्याची माहिती देण्यात आली.

मात्र, सोनारबागवासीयांनी त्यास विरोध केला. पाण्याचे नियोजन करायचे होते, तर ते आधी का केले नाही, आता म्हादईचे पात्र कोरडे पडल्‍यानंतर तुम्हाला जाग आली आहे काय, असा सवालही ग्रामस्थांनी केला. कोणत्याही स्थितीत बंधारा नकोच, आमची घरेदारे सोडून आम्हाला जायचे नाही, असे ग्रामस्थांनी सुनावले.

त्यामुळे शेवटी ही जनसुनावणी आटोपती घ्यावी लागली. यावेळी जलस्रोत खात्याचे अभियंते प्रमोद बदामी, फोंडा जलस्रोत खात्याचे विभाग ४ चे साहाय्यक अभियंते शैलेश नाइक, फोंड्याचे संयुक्त मामलेदार जान्हवी कालेकर, उसगावचे सरपंच नरेंद्र गावकर, उपसरपंच संगीता डोइफोडे, पंच गोविंद परब फात्रेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

"पाण्याची गरज भागवण्यासाठी बंधारा बांधण्याची आवश्‍यकता आहे; मात्र बंधारा बांधण्यासाठी सोनारबाग उसगाववासीयांनी विरोध केल्यामुळे तसा अहवाल आम्ही सरकारला देणार आहोत. इतरत्र कुठेही अशाप्रकारचा विरोध होत नाही; पण इथेच लोकांचा विरोध असल्यामुळे एका चांगल्या प्रकल्पाला लोकांना मुकावे लागेल."
प्रमोद बदामी (मुख्य अभियंते, जलस्त्रोत खाते)

लोकांच्‍या डोळ्यांना पाणी लावू नका

म्हादई नदीचे पाणी गोमंतकीयांना पुरेसे होते; मात्र हे पाणी पळवण्यासाठी सरकारनेच कर्नाटकला मदत केली. त्यामुळे आणखी बंधारे बांधून लोकांच्या डोळ्याला पाणी लावू नका, कुणाच्या हितासाठी हा प्रकल्प सरकार हाती घेत आहे, असा जाबही ग्रामस्थांनी विचारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT