Sonali Phogat  Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat प्रकरणी गोवा पोलिस अ‍ॅक्शन मोडवर, फार्म हाऊसवर होणार सोनालीवर अंत्यसंस्कार

सोनाली फोगटचा सहकारी सुखविंदर आणि तिचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान यांना अंजुना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Sonali Phogat Death: गोवा पोलिसांनी भाजप नेते आणि बिग बॉस स्पर्धक सोनाली फोगटचे सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांना अंजुना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या संदर्भात गोव्याचे पोलीस महानिरीक्षक (IGP), ओमवीर सिंग बिश्नोई यांनी सांगितले की, "सोनाली फोगटचा सहकारी सुखविंदर आणि तिचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान यांना अंजुना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे."

सोनाली फोगटचा भाऊ रिंकू ढाका याने गोवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली की, 'त्याच्या बहिणीवर तिचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांनी बलात्कार केला आणि मालमत्तेसाठी तिची हत्या केली.' सोनाली फोगटने 23 ऑगस्ट रोजी तिच्या मृत्यूच्या काही तास आधी तिची आई, बहीण आणि भावाशी बोलल्याचेही रिंकू ढाकाने सांगितले.

सोनालीला कट रचून आणले गोव्यात

"सोनाली फोगटच्या पीएने तिच्या जेवणात नशेचं औषध घातलं आणि तिच्यावर बलात्कार केला." असे म्हणत यासोबतच रिंकू ढाकाने सोनालीचा गोव्याला जाण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा दावाही केला आहे. हॉटेलमधील दोन खोल्या केवळ दोन दिवसांसाठी बुक केल्या होत्या.

दोन जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला

हरियाणातील हिस्सार येथील भाजप नेत्या सोनाली फोगटळा मंगळवारी सकाळी उत्तर गोव्यातील अंजुना येथील सेंट अँथनी रुग्णालयात मृत घोषीत करण्यात आले. प्राथमिक अहवालानुसार तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. पण, सोनालीचा खून झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यापूर्वी गोवा पोलिसांनी सोनाली फोगटच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी गुरुवारी दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगटवर आज हिसार येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. ऋषी नगर येथील स्मशानभूमीत सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुरुवारी रात्री 11.45 वाजता सोनाली फोगटचा मृतदेह एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून दिल्ली विमानतळावर आणण्यात आला. सोनालीचे पार्थिव दुपारी अडीच वाजता हिसार येथे पोहोचले. सध्या सोनालीचा मृतदेह हिस्सार सिव्हिल हॉस्पिटलच्या मार्चरी हाऊसमध्ये ठेवण्यात आला आहे. सोनालीचे कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. प्रथम पार्थिव येथून सोनालीच्या फार्म हाऊसवर नेण्यात येईल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT