Sonali Phogat last video Dainik Gomantak
गोवा

सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने पेय पाजतानाचा व्हिडिओ व्हायरल

पोलीसांनी या व्हिडिओचा दाखला देत संशयिताना घेतलं ताब्यात

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात गेले काही दिवस सोनाली फोगट खून प्रकरणाने अनेक वळणे घेतली आहेत. आज या प्रकरणात संशयित सुधीर सांगवान व सुखविंदर पाल सिंग या दोघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या सोनाली फोगाट यांना संशयिताने जबरदस्ती पेय पाजतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

(Sonali Phogat being forced to drink Video goes viral)

या व्हिडिओमध्ये फोगट या संशयितासोबत डान्स करताना दिसत आहेत. काही वेळ डान्स केल्यानंतर संशयिताने त्यांना जबरदस्तीने पेय पाजत असल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे. यानंतर काही वेळातच फोगट यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. त्यामूळे हेच पेय पाजत संशयितांनी त्यांना संपवलं का ? या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट होत नसले तरी इच्छा नसताना पेय पाजलं गेलं हे मात्र यातून अगदी स्पष्टं होते आहे.

कर्लीस क्लब पोलीसांनी केला सील

मुख्य घडमोडी ज्या ठिकाणी घडल्या त्या कर्लीस क्लबला आता पोलीसांनी ताब्यात घेतले असूत तपासाकरीता याची आवश्यकता असल्याची माहिती पोलीसांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

या प्रकरणातील सर्व शक्यता पडताळून पाहात गुन्ह्यात सामिल गुन्हेगारांचा पडदा फाश करण्यात येणार असल्याचं गोवा पोलीसांनी स्पष्ट केले आहे. संबंधित कर्लीस बार मालकाला आता अटक झाल्यामूळे राज्यातील सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असा आरोप ही राजकिय पक्षांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catch Of The Year! शुभमन गिलची भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT