Google Map Canva
गोवा

'Google'ने गावांची नावेच बदलली! नाराज नागरिकांनी घेतली कॅप्टन विरियातो यांची भेट

Goa Villages: बेताळभाटीचे नाव भाटले, कोन्सुवाचे कोन्सू त्याच प्रमाणे आके, उतोर्डा, करमणे, कोलवा सारख्या गावांची नावेही बदलली आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: गुगलने प्रसिद्ध केलेल्या गोव्यातील नकाशावर अनेक गावांची नावे बदलली आहेत. बेताळभाटीचे नाव भाटले, कोन्सुवाचे कोन्सू त्याच प्रमाणे आके, उतोर्डा, करमणे, कोलवा सारख्या गावांची नावेही बदलली आहेत. आज बाणावली येथील नागरिकांनी या संदर्भात दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही बाब घातली.

रेल्वे तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिकारिणीने सुद्धा अनेक गावांची नावे बदलली आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. ही नावे बदलल्यास बराच काळ झाला. मात्र यावर कुणीही आवाज उठवला नव्हता असे रुझारियो फर्नांडिस, थॉमस कॉस्ता व किथ ग्रासियस यांनी सांगितले.

गुगलवरील नावे सर्व जगामध्ये पोहोचतात. त्यामुळे त्यात बदल करणे गरजेचे आहे असे दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले. आपण हा प्रश्न गुगलकडे चर्चा करून सोडवू, असे त्यांनी दिले.

गुरुवारी खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इमारतीत लोकांची गाऱ्हाणी, प्रश्र्न व समस्या समजून घेतल्या. पत्रकारांशी बोलताना फर्नांडिस यांनी सांगितले की, आपल्याकडे काही लोक आले होते ज्यांच्या घराकडे जाण्यासाठी गेल्या ४० वर्षांपासून रस्ता नाही. आमदाराकडे असलेल्या शिल्लक वादामुळे ते रस्ता करून देत नाहीत. आपण त्यांना यात लक्ष घालू असे सांगितल्याचे त्यांनी सांगितले. एक कुटुंब आपल्या मुलाला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आले होते.

काही लोक पाणथळ जमिनीचा प्रश्न घेऊन आले होते. या संदर्भात बोलताना खासदार यांनी सांगितले की, जे संबंधित खाती व अधिकारी आहेत त्यांनी स्थानिकांना विश्र्वासात घेणे आवश्यक आहे. त्यांना पाणथळ जमिनीचे फायदे व नुकसान या दोन्ही बाजू समजावून सांगितल्या पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

कुटबण जेटी पाहणी

आपण लवकरच कुटबण जेटीवर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात न होण्यासाठी उपाययोजना करण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सांगोडोत्सव गाजला! मांडवीच्या पाण्यावर रंगला 'खुनी हनिमून', 'छावा' आणि ‘शरभ अवतार' देखाव्यांची जोरदार चर्चा; Watch Video

Pitru Paksha 2025: ‘या’ दिवशी सुरू होतोय पितृ पक्ष, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या तारीख आणि नियम

Cricketer Retierment: आशिया कपपूर्वी भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम, IPLमध्ये 3 वेळा घेतलीय हॅटट्रिक

Court Ruling: लग्न केलं म्हणून बलात्काराचा खटला रद्द; किशोरवयापासून होते प्रेमाचे संबंध

Karul Ghat Landslide: गणेशभक्तांना फटका! करुळ घाटात दरड कोसळली; परतीचा प्रवास ठप्प

SCROLL FOR NEXT