Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Rain Update: अवकाळीने झाेडपले; तुळशी विवाहावर पाणी

Rain Update: राज्यात पेडणे, सत्तरी आणि तिसवाडी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी शुक्रवारी रात्री ढगांच्या प्रचंड गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला.

दैनिक गोमन्तक

Rain Update: राज्यात पेडणे, सत्तरी आणि तिसवाडी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी शुक्रवारी रात्री ढगांच्या प्रचंड गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. सुमारे एक तास जोरदार पावसाने झोडपले. पेडण्यात रात्री पावसाचा जोर कमी झाला असला, तरी ढगांच्या गडगडाटासह पहाटे तीन वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.

पाऊस सुरू झाल्यामुळे वीजही गायब झाली. पाऊस बंद झाल्यावर वीजपुरवठा सुरळीत झाला. शुक्रवारपासून तुळशी विवाह सुरू झाले असले, तरी अनेक ठिकाणी ते व्हायचे आहेत. तुळशी विवाहानिमित्त रंगरंगोटी केलेली तुळशीवृंदावने लोकांनी प्लास्टिकने झाकून ठेवली. मात्र, आच्छादन न घातलेल्या तुळशी वृंदावनांची रंगरंगोटी खराब झाली.

तिसवाडी तालुक्यात सांताक्रुझ, ताळगाव भागात शुक्रवारी पहाटे पाऊस पडला. साकोर्डा भागात शनिवारी दुपारी हलक्या सरींनी हजेरी लावली. मात्र, संध्याकाळी 3.45 च्या सुमारास पुन्हा जोरदार अवकाळी पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात गारवा पसरला. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळाला. अर्ध्या तासानंतर परिसरात वादळी वारे सुटले आणि ढग गडगडू लागले. पुन्हा या परिसराला अवकाळी पावसाने झोडपले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

SCROLL FOR NEXT