Seafood Health Risks Dainik Gomantak
गोवा

Goa: गोमंतकीयांनो सावधान..! माशांचे अतिसेवन किडनीला ठरू शकते मारक, संशोधनात धक्कादायक माहिती उघड

Goa Seafood Health Risks: मासळीविना अनेकांच्या गळ्याखाली घास उतरत नाही, परंतु माझ्या संशोधनात काही मासे असे आहेत, ज्यांचे सेवन जर मोठ्या प्रमाणात दीर्घकाळ होत असेल, तर त्याचा परिणाम मूत्रपिंडाच्या आजाराचे कारण होऊ शकते.

Sameer Amunekar

पणजी: गोवा हे समुद्रकिनारी राज्य असल्याने येथे विविध प्रकारचे समुद्री माशांचे मनसोक्त सेवन केले जाते. मासळीविना अनेकांच्या गळ्याखाली घास उतरत नाही, परंतु माझ्या संशोधनात काही मासे असे आहेत, ज्यांचे सेवन जर मोठ्या प्रमाणात दीर्घकाळ होत असेल, तर त्याचा परिणाम मूत्रपिंडाच्या आजाराचे कारण होऊ शकते, असे मत लखनौ येथील संजय गांधी मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. नारायण प्रसाद यांनी व्यक्त केले.

गोवा विद्यापीठातील डी. डी. कोसंबी महाशाळेतील सामाजिक विज्ञान अध्ययन शाखा आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल सेंटर गोवा येथे आयोजित भारतातील मुत्रपिंड आरोग्य राष्ट्रीय परिषदेच्या उद्‍घाटनावेळी बीजभाषक म्हणून ते बोलत होते. यावेळी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन, प्रा. नागेंद्र राव, प्रा. अरविंद हळदणकर, प्रा. केवल नाईक उपस्थित होते.

प्रा. नारायण प्रसाद म्हणाले, मूत्रपिंडाचा आजार टाळण्यासाठी पारा प्रमाण अधिक असणाऱ्या माशांचे सेवन कमी करणे, बांगडा, पेडवे, तारली, रावस आदी माशांचे सेवन करणे योग्य ठरेल.

अलीकडील जागतिक स्तरावरील आजारांचा अहवाल पाहिल्यास कर्करोग, हृदयविकार यासारख्या आजारांत दिवसेंदिवस घट होत आहे, परंतु मूत्रपिंडविकारासारख्या दीर्घकालीन आजारांमुळे अधिक मृत्यू होत आहेत. २०४० पर्यंत दीर्घकालीन आजाराने मृत्य होण्याचे सर्वसामान्य कारण ठरणार असून ही धोक्याची घंटा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

गोवा हे समुद्रकिनारी राज्य असल्याने येथे विविध प्रकारचे समुद्री माशांचे मनसोक्त सेवन केले जाते. मासळीविना अनेकांच्या गळ्याखाली घास उतरत नाही, परंतु माझ्या संशोधनात काही मासे असे आहेत, ज्यांचे सेवन जर मोठ्या प्रमाणात दीर्घकाळ होत असेल, तर त्याचा परिणाम मूत्रपिंडाच्या आजाराचे कारण होऊ शकते, असे मत लखनौ येथील संजय गांधी मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. नारायण प्रसाद यांनी व्यक्त केले.

गोवा विद्यापीठातील डी. डी. कोसंबी महाशाळेतील सामाजिक विज्ञान अध्ययन शाखा आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल सेंटर गोवा येथे आयोजित भारतातील मुत्रपिंड आरोग्य राष्ट्रीय परिषदेच्या उद्‍घाटनावेळी बीजभाषक म्हणून ते बोलत होते.

यावेळी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन, प्रा. नागेंद्र राव, प्रा. अरविंद हळदणकर, प्रा. केवल नाईक उपस्थित होते. प्रा. नारायण प्रसाद म्हणाले, मूत्रपिंडाचा आजार टाळण्यासाठी पारा प्रमाण अधिक असणाऱ्या माशांचे सेवन कमी करणे, बांगडा, पेडवे, तारली, रावस आदी माशांचे सेवन करणे योग्य ठरेल.

दहापैकी एका व्यक्तीला मूत्रपिंडाचा विकार

१) आजकाल दहापैकी एका व्यक्तीला मूत्रपिंडाचा विकार आहे. त्यामुळे यावर योग्य उपाय शोधणे ही काळाजी गरज आहे.

२) गोव्यात मूत्रपिंड विकार समस्या वाढण्याची दोन प्रमुख कारणे आहेत पहिले पर्यावरणासंबंधी आणि दुसरे उष्णता आहे.

३) राज्यातील पाणी प्रदूषण, जमिनीतील धातूंचे प्रमाण, उष्णतेमुळे हायड्रेशन होणे, कष्टकरी वर्गाकडून योग्यवेळी पाणी न पिणे, महिलांनी होत असलेल्या त्रासांबाबत न सांगणे, नागरिकांमध्ये आरोग्य साक्षरतेची कमतरता अशा अनेक कारणांमुळे मूत्रपिंड विकार वाढत आहेत.

४) त्यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

Rashi Bhavishya 31 July 2025: व्यवसायात लाभ,खर्चावर नियंत्रण ठेवा; अनावश्यक वाद टाळा

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT