South Goa District Hospital Dainik Gomantak
गोवा

MLA Vijay Sardesai: दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळातील समस्या 15 दिवसांमध्ये दूर करा

MLA Vijay Sardesai: सरदेसाईंचे मुख्‍य सचिवांना पत्र: उपाय न योजल्‍यास धरणे आंदोलन

दैनिक गोमन्तक

MLA Vijay Sardesai: मडगावच्‍या दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात ज्‍या त्रुटी आहेत त्‍या पहाण्‍यासाठी काल मंगळवारी जिल्‍हा इस्‍पितळात धडक मोर्चा देणारे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज या साऱ्या त्रुटींबाबत मुख्‍य सचिवांना एका पत्राद्वारे पाठविला असून त्‍यात ‘आयसीयू’ चालत नसल्‍यामुळे रुग्‍णांना होणारे त्रास यावर भर दिला आहे.

15 दिवसांत या त्रुटी दूर करण्‍यासाठी उपाय घेतले जावेत, अन्‍यथा इस्‍पितळासमोर आपण आपल्‍या कार्यकर्त्यांसह धरणे धरू, असा इशारा त्‍यांनी या पत्रातून दिला आहे. सरदेसाई यांनी या पत्रातून 11 ठळक बाबी मांडल्‍या असून या इस्‍पितळात दर दिवशी सुमारे हजार रुग्‍णांची तपासणी केली जाते. तर सुमारे 300 लोकांवर उपचार केले जातात. या इस्‍पितळातील रुग्‍णांची संख्‍या वाढली आहे.

मात्र, त्‍यामानाने येथील कर्मचारी बरेच कमी असून या इस्‍पितळात मल्‍टीटास्‍कींग कर्मचाऱ्यांची संख्‍या बरीच कमी असलेल्‍या बाबीकडे लक्ष वेधले आहे. कॅज्‍युयल्‍टी विभागात परिचारिकांची संख्‍या कमी आहे. तसेच या इस्‍पितळातून जे डॉक्‍टर निवृत्त झाले, त्‍यांच्‍या जागी नवीन तज्‍ज्ञ डॉक्‍टरांची नेमणूक केलेली नाही, याकडेही लक्ष वेधले आहे. या सर्व समस्यांमुळे रूग्णांवरील उपचारांत आणि शस्‍त्रक्रिया करताना अडचणी येतात, असे म्‍हटले आहे.

औषधेही बाहेरून घ्यावी लागतात!

या इस्‍पितळात रुग्‍णांना औषधेही वेळेवर मिळत नाहीत. औषधांचा साठा वेळेवर उपलब्‍ध न झाल्‍यामुळे रुग्‍णांना बाहेरुन औषधे विकत घ्‍यावी लागतात. या इस्‍पितळाच्‍या फार्मसीमध्‍ये कर्मचारी कमी आहेत तसेच प्रयोग शाळेवरचाही ताण वाढलेला आहे. या अवाढव्‍य अशा इस्‍पितळ इमारतीची देखभालही योग्‍यप्रकारे होत नाही. त्‍यामुळे कित्‍येक ठिकाणी गळती सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे येथे काम करणाऱ्या डॉक्‍टरांवर ताणही वाढला आहे. याकडे आमदार विजय सरदेसाई यांनी लक्ष वेधले असून हे नोकरभरती लवकरात लवकर करण्‍यासाठी पावले उचलावीत, असे पत्रात म्‍हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरुन संतापले गोव्याचे मुख्यमंत्री; शांतता आणि एकतेवर हल्ला असल्याची टीका

Panaji: अजगराला फरफटत नेणे, ओढून त्रास देणे भोवले; वन विभागाने घेतली दखल, गुन्हा नोंद

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

Goa Opinion: कुछ भी करो, चलता है! गोव्याला जबाबदार पर्यटक अन् कठोर नियमांची गरज

SCROLL FOR NEXT