Goa Solar Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Goa Ferry Boat: आता चोडण ते पणजी 20 मिनिटांत, जाणून घ्या सविस्तर माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Ferry Boat: नदी परिवहन खात्यातर्फे चोडण ते पणजी या मार्गावर उद्या सोमवारपासून सोलर पॉवर फेरीबोट सेवा सुरू करण्यात येणार आहे. दररोज सकाळी चोडण बेटावरून दोन फेऱ्या आणि पणजी येथून दोन फेऱ्या मारण्यात येणार आहेत. सोलर पॉवर फेरीबोट पणजी ते चोडण हे अंतर 20 मिनिटांत पूर्ण करते.

नदी परिवहन खात्याचे वरिष्ठ अधिकारी विक्रमसिंग भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेआठ वाजता ही फेरीबोट चोडण फेरी धक्क्यावरून सुटेल आणि ती वीस मिनिटांत पणजी येथील कॅसिनो धक्क्यावर पोहोचेल. दुसरी फेरीबोट सकाळी साडेनऊ वाजता माडेल-चोडण धक्क्यावरून सुटेल.

पणजी येथील कॅसिनोकडे असलेल्या धक्क्यावरून संध्याकाळी साडेचार वाजता आणि नंतर साडेपाच वाजता अशा दोन फेऱ्या मारल्या जातील. पहिल्या 15 दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर या फेऱ्या मारल्या जातील. 60 प्रवाशांची आसन क्षमता असलेली ही सोलर पॉवर फेरीबोट पणजी ते चोडण हे अंतर 20 मिनिटांत पूर्ण करते. 15 दिवसांनी आढावा घेतल्यानंतर या सेवेत बदल केला जाईल, असेही भोसले म्हणाले.

विद्यार्थी, पर्यटकांना संधी

या फेरीबोटीमुळे चोडण बेटावरील खास करून ज्यांच्याकडे स्वतःची वाहने नाही, तसेच विद्यार्थी व पणजीकडे बाजारासाठी जाणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध होईल. तसेच पर्यटकांना चोडण बेटावरील पक्षी अभयारण्य पाहण्यासाठी थेट संधी मिळणार आहे, असे विक्रमसिंग भोसले यांनी सांगितले.

चोडण-रायबंदर जलमार्गावर रो-रो सेवा

चोडण-रायबंदर जलमार्गावर मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक लक्षात घेऊन सरकारने येथे रो-रो फेरीबोटी सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. काही महिन्यांपूर्वी नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, खात्याचे वरिष्ठ अधिकारी विक्रमसिंग भोसले, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट व इतरांनी रो-रो फेरीबोट सेवा सुरू करण्यासाठी कोचीन-केरळ येथे जाऊन फेरीबोट बांधणीच्या कामाची पाहणी केली होती. या पाहणीनंतर याच पद्धतीच्या फेरीबोटी या मार्गावर सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे भोसले यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT