Blood Donation |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: समाजसेवेत ‘सार्थक’चे भरीव योगदान

आरोग्य क्षेत्रात ‘सार्थक’चे कार्य उल्लेखनीय असून अनेकांना रक्तदानातून जीवदान देण्याचे सार्थक फाऊंडेशनने केले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: समविचारी लोक जेव्हा एकत्र येऊन एकाच ध्येयाने प्रेरित होतात, त्यावेळी अनेक समाजोपयोगी उपक्रम साकारले जातात. राज्यात अनेक अशा संस्था-संघटना आहेत. मात्र, त्यातील सार्थक फाऊंडेशनने केलेले कार्य उजवे ठरणारे आहे. विशेषतः आरोग्य क्षेत्रात ‘सार्थक’चे कार्य उल्लेखनीय असून अनेकांना रक्तदानातून जीवदान देण्याचे पुण्य कार्य ‘सार्थक’ने केले आहे.

सार्थक फाऊंडेशनची स्थापना 2019 साली झाली. संपूर्ण गोव्यात ‘सार्थक’चे कार्य सुरू आहे. आतापर्यंत सार्थक फाऊंडेशनने 152 रक्तदान शिबिरे, 22 नेत्रचिकित्सा, 7 मोफत वैद्यकीय आणि 3 करिअर गाईडन्सची शिबिरे घेतली.

याकामी फाऊंडेशनला तज्ज्ञ वक्ते, डॉक्टर्स, परिचारिका यांची मदत लाभली. विशेषतः गोमेकॉ, हॉस्पिसिओ, मणिपाल, अपोलो, व्हिक्टर तसेच आझिलो या इस्पितळांतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विविध ठिकाणी शिबिरे घेणे शक्य झाले.

या इस्पितळांच्या योगदानामुळे आरोग्य सेवा करणे फाऊंडेशनच्या सदस्यांना सोपे झाले, असे ‘सार्थक’चे निमंत्रक सुदेश नार्वेकर यांनी सांगितले. स्वतः नार्वेकर यांनी आतापर्यंत 101 वेळा रक्तदान केले आहे. हा राज्यातील एकप्रकारचा विक्रमच मानला पाहिजे.

लष्करी सेवेबाबत जनजागृती

आज-काल युवा वर्ग नोकरीच्या शोधात आहे. अनेकांना सरकारी नोकरी हवी असते. पण लष्करात भरती होऊन देशसेवा करण्यासाठी विशेषतः गोव्यातून कुणी बाहेर पडत नाही. फोंड्यातील 6-टीटीआर लष्करी तळावर भरतीसाठी निवड चाचणी होते.

त्यासाठी देशभरातून युवक फोंड्यात येतात; पण फोंड्यात आल्यावर त्यांना योग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने गेल्या वर्षी सार्थक फाऊंडेशनने सुमारे सहाशे युवकांची चहा-नाश्‍त्याची सोय केली.

शिवाय लष्करात भरती होण्यासाठी गोमंतकीय युवकांत जनजागृती करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांसह करिअर गाईडन्सच्या माध्यमातून शिबिरे आणि कार्यक्रम आयोजित केले. आता गोमंतकीय तरुणही मोठ्या संख्येने लष्करात भरती होऊ लागले आहेत, ही महत्त्वाची बाब आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT