Bicholim Market: डिचोलीचे बाजार संकुल अखेर बनले प्रकाशमय!

डिचोली बाजार संकुलातील वीजपुरवठा अखेर सुरळीत करण्यात आल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Bicholim Market
Bicholim MarketDainik Gomantak

Bicholim Market: डिचोली बाजार संकुलातील वीजपुरवठा अखेर सुरळीत करण्यात आल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. काल बुधवारी ऐन आठवडी बाजाराच्या दिवशीच बाजार संकुलातील वीज कनेक्शन तोडल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. विक्रेतेही संतप्त बनले होते.

सायंकाळनंतर बाजारात अंधार पसरल्याने बाजारातील लहान-सहान विक्रेत्यांनी गोंधळही घातला होता. याप्रकरणी विक्रेत्यांनी पालिकेला जबाबदार धरले होते. वीजपुरवठा सुरळीत न केल्यास सोपो भरण्यात येणार नाही, असा इशाराही विक्रेत्यांनी दिला होता.

कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा वीजबिलाच्या थकबाकीमुळे नव्हे, तर वीज कर्मचाऱ्यांनी कोणतीही खातरजमा न करता वीज कनेक्शन तोडले. त्यामुळे काल बुधवारी बाजार संकुल काळोखात राहिले आणि विक्रेत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

Bicholim Market
Goa Agriculture: नद्यांच्या काठी बहरल्या पोफळी बागायती!

वीजपुरवठा सुरळीत होताच भरला ‘साेपो’

मिळालेल्या माहितीनुसार, वीज कर्मचाऱ्यांनी बाजार संकुलातील काही थकबाकीदार दुकानदारांचे कनेक्शन तोडताना नजरचुकीने बाजार संकुलाचे कनेक्शन तोडले होते.

वीज खात्याच्या डिचोली कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच गुरुवारी सकाळी बाजार संकुलातील वीज कनेक्शन जोडून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्‍यामुळे विक्रेत्यांनी नियमित सोपोही भरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com