Adil Shah Palace In Goa Dainik Gomantak
गोवा

Adil Shah Palace In Goa: विकासाची लाट, आदिलशाही पॅलेसची 'वाट'; सामाजिक कार्यकर्त्या सिसील रॉड्रिगीज यांची आर्त हाक!

Social activist Cecil Rodriguez: सिसील म्‍हणतात, ही वास्‍तू धोकादायक बनली आहे. तिथे काम करणाऱ्यांना, संगीताचे वर्ग चालवणाऱ्यांना आणि संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना इजा होऊ शकते.

Manish Jadhav

पणजी: राज्‍य विकासाचे उंच झोके घेत असल्‍याची शेकी सरकार मिरवत असते. परंतु गोव्‍यातील एक महत्त्‍वाचे वारसास्‍थळ अर्थात पणजी येथील जुने सचिवालय अत्‍यंत दुरावस्‍थेत आहे. त्‍याकडे सामाजिक कार्यकर्त्या सिसील रॉड्रिगीज यांनी पोटतिडकीने लक्ष वेधले आहे. त्‍

त्यांनी वस्‍तुस्‍थिती दर्शवणारा तयार केलेला एक व्‍हिडिओ समाजमाध्‍यमांवर चांगलाच व्‍हायरल होत आहे. त्‍यात सिसील यांनी आदिलशहा पॅलेसची अवस्‍था दर्शवत कठोर भाष्‍य केले आहे.

सिसील म्‍हणतात, ही वास्‍तू धोकादायक बनली आहे. तिथे काम करणाऱ्यांना, संगीताचे वर्ग चालवणाऱ्यांना आणि संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना इजा होऊ शकते. इमारतीचे लाकडी छप्पर जीर्ण झाले आहे. भिंतीवरील रंगाचा थर उखडला आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध स्थळे जीर्णावस्थेत असताना इतर विकास प्रकल्पांसाठी निधीचे तत्परतेने वाटप होत असल्याचे पाहून मन खट्टू होते, असेही त्‍या म्‍हणाल्‍या. सरकारने जुन्या सचिवालयाला गतवैभव प्राप्‍त करुन द्यावे, अशी त्‍यांनी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट खून प्रकरणातील आरोपीला विदेशात जाण्याची परवानगी; बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंडोनेशियाला जाणार

Goa Postcard Campaign: संत मीराबाई शिल्पाची 31 वर्षे, 5 दिवसात 3184 पोस्टकार्डांचा विक्रम

Goa Sand Mining: महिन्याभरात पाऊस थांबेल, विकासकांची बांधकामे वेग पकडतील; वाळू समस्येचे ‘गँग्रीन’

नवी कोरी गाडी घातली समुद्रात! सुरक्षारक्षकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष, हणजूण किनाऱ्यावर पर्यटकाची फजिती; Watch Video

Tillari Accident: ..तिलारीची सहल ठरली अखेरची! ताबा सुटल्याने टेम्पो-दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT