Dinesh Gundu Rao Dainik Gomantak
गोवा

Goa:....म्हणून प्रतापसिंह राणे यांनी निवडणुकीतून माघार घेतली: दिनेश राव

विश्वजित राणे वडिलांच्या राजकारणात आड आले, असा आरोप कॉंग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्ये मतदारसंघात सासरे विरुद्ध सून अशी राजकीय लढत होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र 83 वर्षीय प्रतापसिंह राणे यांनी पर्ये येथे आपल्या सूनविरुद्धच्या निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. विश्वजित राणे वडिलांच्या राजकारणात आड आले आणि विश्वजित यांनीच त्यांना निवडणुकीतून (Election) बाहेर पडण्यास भाग पाडले, असा आरोप कॉंग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला आहे. (Pratap Singh Rane Goa Election)

दिनेश राव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांना निवडणूक लढवायची होती म्हणूनच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यांचे नाव पहिल्या यादीत नव्हते. राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही नंतर त्यांचे नाव जाहीर केले. काँग्रेस (Congress) अध्यक्षांना कळवूनच त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. ते आजही निवडणूक लढवण्यासाठी उत्साही आहेत. प्रतापसिंह राणे यांच्यावर निवडणूक न लढवण्यासाठी कुटुंबाने दबाव टाकला.

कदाचित राणे यांना आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांच्या मुलाशी (प्रतापसिंह राणे) करावासा वाटला नाही किंवा कदाचित मुलाने त्यांना बाजूला सारले. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मुलाने वडिलांचा आदर केला पाहिजे होता, असे दिनेश राव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT