Illegal actions on Goa beaches Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Vigil App: ‘गोवा बिच व्हिजील अॅप’ वर आतापर्यंत 1852 तक्रारींची नोंद; पर्यटन विभागाकडून 1030 तक्रारींचे निवारण!

Goa Government Beach Initiatives: किनाऱ्यांवरील वाढत्या बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी गोवा सरकार युद्धपातळीवर काम करत आहे.

Manish Jadhav

Goa News: किनाऱ्यांवरील वाढत्या बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी गोवा सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. यासाठी सरकारने 'गोवा बीच व्हिजिल ॲपही लॉन्च' केले. आतापर्यंत या ॲपवर 1852 तक्रारींची नोंद झाली आहे. या ॲपवर समुद्रकिनाऱ्यांवरील कचऱ्याचे ढीग साचल्याच्या सर्वाधिक 593 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर मिरामार आणि करंझाळे समुद्रकिनाऱ्याबाबत प्रत्येकी 222 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, समुद्रकिनाऱ्यांवरील बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पर्यटन विभागाने 25 जानेवारी गोवा बीच व्हिजील ॲप लॉन्च केले होते. गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने विकसित केलेल्या या ॲपवर गोमंतकीयांना समुद्रकिनाऱ्यावर घडणाऱ्या बेकायदेशीर गोष्टींचे फोटो काढून अपलोड करण्याची सुविधा आहे. जशी तक्रारी प्राप्त होते तसे पर्यटन विभाग त्याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करतो.

दुसरीकडे, पर्यटन विभागाने ॲप लॉन्च केल्यापासून आतापर्यंत 1852 तक्रारी प्राप्त झाल्या असून 1030 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उत्तर गोव्यातील 17 समुद्रकिनाऱ्यांवरुन तक्रारी तर दक्षिण गोव्यातील (South Goa) 22 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. राज्यातील 37 समुद्रकिनाऱ्यांवर 19 प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक 593 तक्रारी कचऱ्याचे ढिग साचल्याच्या तर 410 तक्रारी कचरा आणि घाण टाकल्याच्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT