Digital Goa: इंटरनेट वापरात गोवा अव्वल! ऑनलाईन बँकिंगचं प्रमाण वाढलं; दुसऱ्या क्रमांकावर 'हे' राज्य!

Goa Leads India In Internet Usage: देशात इंटरनेटचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. इंटरनेट वापराच्या बाबततीत गोमंतकीयही मागे नाहीत.
Digital Goa: इंटरनेट वापरात गोवा अव्वल! ऑनलाईन बँकिंगचं प्रमाण वाढलं; दुसऱ्या क्रमांकावर 'हे' राज्य!
Goa Leads India In Internet UsageDainik Gomantak
Published on
Updated on

देशात इंटरनेटचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. इंटरनेट वापराच्या बाबततीत गोमंतकीयही मागे नाहीत. ऑनलाईन बँकिंग करणे, ईमेल पाठवणे-स्वीकारणे तसेच इंटरनेटच्या माध्यमातून एखादी माहिती शोधणे यामध्ये गोमंतकीय अव्वल ठरले आहेत. होय, हे खरं आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि प्रकल्प अंमलबजावणी खात्याच्या राष्ट्रीय नुमना सर्व्हेक्षण कार्यालयाच्या सर्व्हेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एनएसएसओने राज्यातील 314 शहरी भागातील तर 639 ग्रामीण भागातील तब्बल 3645 गोमंतकीयांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या 15 वर्षांवरील महिला आणि पुरुषांचा या सर्व्हेक्षणात सहभाग नोंदवला होता. संपूर्ण देशासह गोव्यात जुलै 2022 ते जून 2023 पर्यंत हे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. सर्व्हेक्षणानुसार देशात गोवा अव्वल असून तेलंगणाने दुसरा नंबर पटकावला आहे.

Digital Goa: इंटरनेट वापरात गोवा अव्वल! ऑनलाईन बँकिंगचं प्रमाण वाढलं; दुसऱ्या क्रमांकावर 'हे' राज्य!
Goa Digitization: 15 दिवसांत पालिकांच्या सर्व सेवा ‘ऑनलाईन’द्या! मंत्री विश्‍वजित राणेंचा मुख्याधिकाऱ्यांना अल्टिमेटम

सर्व्हेक्षणानुसार, राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी तब्बल 90.6 गोमंतकीयांना इंटरनेच्या माध्यमातून एखादी माहिती घेणे माहिती होते. तर 71 टक्के गोमंतकीयांना ईमेल कसा पाठवायचा आणि कसा स्वीकारायचा हे माहिती होते. तसेच, सुमारे 58.9 टक्के गोमंतकीयांना ऑनलाईन बँकिंग करता येत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com