Mahadayi River | Mahadayi Water Disput Dainik Gomantak
गोवा

Mahadayi River: ...तर चाळीसही आमदारांनी घरी बसावे-प्रताप गावस यांचा इशारा

साखळीतील 'म्हादई बचाव'सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

'म्हादई' हे आमचे अस्तित्व आहे. सर्वांची आई तथा जीवनदायीनी म्हादईवर ओढवलेले संकट दूर करण्यासाठी चाळीसही आमदारांनी पुढाकार घ्यावा. तशी इच्छा नसेल, तर नुसत्या खुर्च्या तापविण्यापेक्षा चाळीसही आमदारांनी राजीनामा देऊन घरी बसावे. (Mahadayi Water Disput)

असा सज्जड इशारा माजी आमदार प्रताप गावस यांनी दिला आहे. साखळी येथे आयोजित केलेल्या 'म्हादई बचाव' 'जनमत कौल' सभेच्या पार्श्वभूमीवर जागृती करण्यासाठी गुरुवारी (ता. 12) सायंकाळी साखळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रताप गावस बोलत होते.

साखळी येथे वाळवंटी नदीकाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी सुनीता वेरेकर आणि मंगलदास नाईक उपस्थित होते. पाणी ही प्रत्येक प्राणीमात्राची गरज आहे. म्हादई वाचली नाही, तर पूर्ण गोव्याचे अस्तित्व धोक्यात येईल.

अशी भीती प्रताप गावस यांनी व्यक्त करुन, जीवनदायीनी म्हादईच्या अस्तित्वासाठी साखळीतील जाहीर सभेस लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहनही त्यांनी केले.

सरकार निद्रिस्त

'म्हादई'प्रश्नी राज्य सरकार निद्रिस्त आहे. ते केवळ गोमंतकियांच्या डोळ्यांना पाने पुसत आहे. असा आरोप सुनीता वेरेकर यांनी केला.

'म्हादई'मुळेच आमचा निसर्ग टिकून आहे. तीच्यामुळेच आम्ही जगत आहोत. म्हादई वळविली, तर भविष्यात निसर्गासह प्रत्येक प्राणीमात्रांचे अस्तित्व संकटात येईल. अशी भीती सुनीता वेरेकर यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Onion Price Goa: कांदा पुन्हा रडवू लागला! पणजी बाजारात किलोमागे 70 रुपये, फलोत्पादन महामंडळाकडून 58 रुपयांत विक्री

Team India World Record: टीम इंडियाचा 'भीमपराक्रम'! टी-20 क्रिकेटमध्ये 200 सामने जिंकणारा भारत ठरला जगातील पहिलाच संघ; रोमहर्षक सामन्यात जपानचा पराभव

Kunal Thakur Success Story: दिव्यांगत्वावर मात करत कुणाल ठाकूर बनले पेडणे पालिकेचे मुख्याधिकारी; शिक्षणासह समाजकार्यातही उमटवला ठसा

Goa Road Accidents: गोव्यात 'वीकएंड' ठरतोय जीवघेणा! ऑगस्टमध्ये 226 अपघात, 20 सप्टेंबरपर्यंत 188 जणांचा मृत्यू

Mershi Porvorim Traffic: मेरशी-पर्वरी मार्गावर वाहतुकीचा फज्जा; अटल सेतू-उन्नत मार्गाचे पर्याय बंद होताच जुन्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT