Smriti Irani Illegal Restaurant  Dainik Gomantak
गोवा

Hotel 'Silly Souls' हॉटेल ‘सिली सोल्स’ प्रकरणाला वेगळे वळण

मूळ मालकाच्या सह्या बनावट : रॉड्रिग्स

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात गाजत असलेल्या ‘सिली सोल्स कॅफे ॲण्ड बार’ प्रकरणाला वेगळे वळण लागले असून मूळ मालक ॲन्थनी डिगामा हे मुंबईहून गेले अनेक वर्षांपासून गोव्याला गेलेच नाहीत. त्यामुळे उत्पादन शुल्क, पंचायत यासंदर्भातील परवान्यांसाठी कुणी सह्या केल्या, हे माहीत नाही, अशी माहिती ॲन्थनीचा मोठा मुलगा डेल याने दिली असल्याचे मुख्य तक्रारदार आयरिश रॉड्रिग्स यांनी आज सांगितले.

(Smriti Irani's hotel 'Silly Souls' case takes a different turn in goa)

रॉड्रिग्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसगाव येथे सर्वे क्र. २३६/२१ मध्ये उभारण्यात आलेल्या ‘सिली सोल्स कॅफे ॲण्ड बार’ या हॉटेलसंबंधी विविध खात्यांकडून परवाने मिळवण्यासाठी माझ्या वडिलांनी सह्या केल्याच नाहीत. या संपूर्ण प्रकरणात माझे वडील हयात असतानाही त्यांना पूर्णत: अंधारात ठेवण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूनंतरही या परवान्यांसाठी अर्जांवर कोणी सह्या केल्या, याची आपल्याला माहिती नाही, असे ॲन्थनीचा मुलगा डेल याने आपल्याला सांगितले. त्यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुतीचे बनले असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांकडून चालविल्या जाणाऱ्या या हॉटेलचे बहुतांश परवाने बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होत आहे. यासंबंधी विविध खात्यांमध्ये चौकशी सुरू असून लवकरच सत्य लोकांसमोर येईल, असे रॉड्रिग्स यांनी म्हटले आहे.

अन्य नातेवाईकही अंधारात

या बारचे मूळ मालक ॲन्थनी डिगामा यांचे वडील अबेल डिगामा हे असून त्यांना तीन मुली आणि ॲन्थनी हा मुलगा हक्कदार आहेत. परवान्यांचे हस्तांतर आणि इतर बाबतीत अंधारात ठेवले असल्याची माहिती डेल यांनी दिल्याचे रॉड्रिग्स म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT