Silly Souls Café and Bar | Smriti Irani Dainik Gomantak
गोवा

स्मृती इराणींच्या ‘सिली सोल्स’समोर अडचणी सुरुच

नगर नियोजन खात्यातही तक्रार; अबकारी खात्यातील सुनावणी 22 ऑगस्टला

दैनिक गोमन्तक

पणजी : उत्तर गोव्यातील आसगाव येथे उभारलेल्या सिली सोल्स बार ॲण्ड रेस्टॉरन्ट विरोधात जमिनीत भराव टाकून जमीन तयार केल्याची लेखी तक्रार नगर नियोजन खात्याकडे आणि संबंधित मंत्र्यांकडे दिली असल्याची माहिती तक्रारदार ॲड. आयरीश रॉड्रिगीज यांनी दिली आहे.

खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या परवान्यावर अबकारी खात्यात तक्रार केली होती. यावर बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसवर आज (शुक्रवारी) सुनावणी झाली. याबाबत संबंधित मालकांना त्यांचे लिखित मत देण्याची सूचना अबकारी आयुक्त नारायण गाड यांनी केली आहे. याबाबतची पुढील सुनावणी 22 ऑगस्टला ठेवली आहे.

ॲड. आयरिश रॉड्रिगीज म्हणाले, आसगाव येथे उभारण्यात आलेल्या सिली सोल्स हे हॉटेल केंद्रीय महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांच्या संबंधितांचे आहे. या हॉटेलला दिलेला बार परवाना हा हॉटेल परवाना मिळण्यापूर्वी देण्यात आला होता. ही गंभीर चूक आहे याशिवाय जो दाखला देण्यात आला होता, तो मृत व्यक्तीच्या नावे दिला होता. यासंबंधी अबकारी खात्याकडे ॲड. रॉड्रिगीस यांनी तक्रार केली होती. या तक्रारीला मूळ मालक स्व. ॲंथोनी डिगामा यांचा मुलगा डिन डिगामा याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यावर अबकारी आयुक्तांसमोर सुनावणी झाली.

आयुक्तांनी संबंधितांना त्यांचे लिखित मत मांडण्याची सूचना केली असून, पंचायत निवडणुका असल्याने आणि कर्मचारी वर्ग या निवडणुकांमध्ये व्यस्त असल्‍याने या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 ऑगस्टला ठेवली आहे. दुसरीकडे हे हॉटेल उभारणी करताना बेकायदेशीररित्या जमिनीत भराव टाकून जमीन बनविण्यात आली आहे. हे नगरनियोजन कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन आहे. या संबंधीची लेखी तक्रार खात्याकडे आणि नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांना दिली आहे.

‘सिली सोल्स’ या हॉटेल विरोधात खोट्या कागदपत्रांच्या आधारे बार परवाना मिळवल्याबद्दल अबकारी खात्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. हॉटेल उभारताना पंचायतींचा कोणताच परवाना घेतलेला नाही. त्यामुळे हे हॉटेल बेकायदा आहे. यामुळे या विरोधात पंचायत संचालकांकडे तक्रार केली आहे. तर नगरनियोजन खात्याच्या विविध कलमांचे उल्लंघन झाल्यामुळे या खात्यातही तक्रार केली असल्याची माहिती ॲड. रॉड्रिगीस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: राष्ट्रीय महामार्ग अनमोड येथे खचल्याने अनमोड घाटावरुन जाण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंद

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT