Smile Keeper Foundation Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: ..माणसाने माणसाशी माणसासम वागणे! वंचित मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू; ‘स्माईल्स किपर' देतेय शिक्षणाचे धडे

Smile Keeper Foundation Goa: शिक्षणपासून आजही अनेक मुले वंचित आहेत. या वंचित मुलांना अक्षरांची ओळख व्हावी यासाठी ‘स्माईल्स किपर फाउंडेशन’ प्रयत्न करीत आहे.

Sameer Panditrao

सांगे: शिक्षणपासून आजही अनेक मुले वंचित आहेत. या वंचित मुलांना अक्षरांची ओळख व्हावी यासाठी ‘स्माईल्स किपर फाउंडेशन’ प्रयत्न करीत आहे. राज्यातील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांपर्यंत पोहचत त्यांना शिक्षणाचे दार उघडे केल्याने या निरागस विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आता हास्य फुलले आहे. स्माईल्स किपर फाउंडेशनचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

ज्या मुलांची शिक्षणाविना मानसिक स्थिती ढासळली जाते अशा मुलांना हेरून त्यांना शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे कार्य स्माईल किपर फाउंडेशनने हाती घेतले आहे. बाल मजुरी करणाऱ्या मुलांना एकत्र करून शिक्षणाचे बाळकडू समजावून त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

मुलांना त्यांच्याच झोपडपट्टीत एकत्र करून शालेय साहित्य देवून प्रथम अक्षर ओळख करून दिली जात आहे. ज्या वयात काम करण्यासाठी मुलं रुची घेतात, त्यांना फावल्यावेळेत शिक्षणाचा अनुभव दिला जात आहे. पोटा पाण्यासाठी फिरणाऱ्या मजुरांच्या मुलांना शिक्षण हा विषयच माहीत नसतो, म्हणून आजच्या काळात शिक्षणाची ओळख नसलेला कोणीही असू नये यासाठी स्माईल किपर्स संघटना झोपडपट्टी हेरून तिथल्या परिस्थितीची जाणीव करून मजुरांच्या मुलांना शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न करीत आहे.

आरोग्याच्या काळजीविषयीही जनजागृती

कामधंद्यानिमित्त हजारो कामगार आपल्या मुलांना घेऊन गोव्यात काम करीत असताना त्यांच्या मुलांना परिस्थितीमुळे शिक्षण मिळत नाही. अशा मुलांना शिक्षणाबरोबर आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचेही धडे स्माईल किपरकडून दिले जात आहे. आरोग्य केंद्रात कोणते फायदे आपल्यासाठी उपलब्ध असतात याची सखोल माहिती प्रत्येक झोपडपट्टीत जाऊन दिली जात आहे, असे स्माईल किपर्स फाउंडेशनचे प्रमुख युनूस शेख यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT