Panaji EV Smart Bus Stop Dainik Gomantak
गोवा

Panaji: पणजीतील स्मार्ट बसस्टॉप शेडचा विषय बारगळला? काही ठिकाणी अर्धवट सांगाडे; नागरिक साशंक

Panaji EV Smart Bus Stop: स्मार्ट पणजी शहरातील ईव्ही बसेससाठी उभारण्यात आलेले स्मार्ट बसस्टॉप शेड निर्मितीचा विषय गुंडाळला गेला की काय? असा प्रश्न पडू लागला आहे.

Sameer Panditrao

पणजी: स्मार्ट पणजी शहरातील ईव्ही बसेससाठी उभारण्यात आलेले स्मार्ट बसस्टॉप शेड निर्मितीचा विषय गुंडाळला गेला की काय? असा प्रश्न पडू लागला आहे. कारण ज्या आराखड्यानुसार ते उभारले गेले, त्याला मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आक्षेप घेतला होता, त्यानंतर ते बदलले जातील आणि नव्याने उभारणी होईल असे वाटत होते, परंतु ते कामच आता होणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

बसस्टॉपची उभारणी गेल्यावर्षीपासून परराज्यातील कंत्राटदाराने सुरू केली होती. त्यासाठी प्राथमिक स्तरावर बसस्टॉप कसा असेल, यासाठी कला अकादमीसमोर डेमो बसस्टॉप उभारण्यात आला होता.

परंतु तो बसस्टॉप मंत्री मोन्सेरात यांच्या पसंतीस उतरला नाही, त्यांनी त्याला आक्षेप घेतल्याने पुन्हा त्या बसस्टॉपचा आराखडा तयार केला आणि त्यापद्धतीने सर्वत्र उभारण्यास सुरवात झाली. इमेजीन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) हे बसस्टॉप अपंग व्यक्तींसाठीच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि सर्व प्रवाशांसाठी स्मार्ट बस शेल्टर सोयीस्कर आणि आरामदायी असतील, असे जाहीर केले होते.

स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट ईव्ही बसेस धावू लागल्या आहेत, परंतु त्यासाठी आवश्यक असणारे बसस्टॉप शेडची उभारणी पूर्णपणे करण्यात आली नाही. अर्धवट स्थितीत काही ठिकाणी बसस्टॉपवरील शेड आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी शेड उभारणे बाकी आहे. सध्या या बसस्टॉपचा विषय कोणीही काढत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: आमचा अर्थसंकल्‍प चतुर्थीच्‍या माटोळीसारखा!

Goa Rain: गोवेकरांनो सावधान! राज्यात रेड अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

Watch Video: जिद्दी कुंबळे! तुटलेला जबडा घेऊन खेळला अन् लाराची विकेट घेतली; भारतीय क्रिकेट इतिहासातील 'तो' ऐतिहासिक क्षण

Teen Steals ₹95 Lakh:बाबांचा मृत्यू, आई दिल्लीत असताना लहान मुलाने घरातून चोरी केले 95 लाख, मित्रासोबत निघाला होता गोव्याला; विमानतळावर घेतले ताब्यात

Record-Breaking Win:टेनिस क्वीन व्हीनस विल्यम्सची कमाल! 22 वर्षांनी लहान खेळाडूला नमवून जिंकला सामना; अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी सर्वात वयस्कर खेळाडू

SCROLL FOR NEXT