Panaji: बाबूशनी एकदा दुचाकीवरून प्रवास करावाच! पणजीतील नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया; रस्त्यांच्या अवस्थेने चालक त्रस्त

Babush Monserrate: एका रहिवासी सोसायटीतील एकाला ओबडधोबड बसविलेल्या पेव्हर्समुळे जो अपघात झाला होता, तो पाहता अजूनही त्या ठिकाणच्या पेव्हर्स बसविण्यात सुधारणा झालेली नाही.
Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी फोन्तेन्हास येथील चर्चपासून ते भाटलेतील श्रीराम मंदिरापर्यंतच्‍या रस्‍त्‍यावर गर्दीच्या वेळी दुचाकीवरून प्रवास करावा, म्हणजे या मार्गावर किती त्रास सहन करावा लागतोय हे समजेल, अशा संतप्‍त प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

येथील एका रहिवासी सोसायटीतील एकाला ओबडधोबड बसविलेल्या पेव्हर्समुळे जो अपघात झाला होता, तो पाहता अजूनही त्या ठिकाणच्या पेव्हर्स बसविण्यात सुधारणा झालेली नाही. या ठिकाणी ताळगाव परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली होती, तेव्हा खोदकामानंतर पेव्हर्स बसविण्यात आले.

Babush Monserrate
Belagavi–Chorla Road Closed: बेळगाव-चोर्ला मार्ग ठप्प! माळप्रभा नदीवरील पूल गेला वाहून, गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचा मार्ग बदलला

पण पुन्हा एकदा अवजड वाहनांमुळे पेव्हर्स खाली-वर झाले आहेत. शिवाय रस्ता अरुंद आहे, पण कदंब बसस्थानकाकडून येणारे वाहनचालक ताळगाव, मिरामार व आल्तिनो येथे जाण्यासाठीजवळचा मार्ग असल्याने याच मार्गाचा वापर करतात. गेल्या वर्षी पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. अजूनही तो तसाच आहे.

Babush Monserrate
Road Safety: गोव्यातील अपघात कमी करण्‍यासाठी आणखी एक पाऊल! ड्रायव्हर सेन्सिटायझेशन टॅब लॅब; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

नेवगीनगर- पाटो पूल रस्ताही खडबडीत

चारचाकी वाहनचालक रस्ता आपल्या मालकीचाच असल्यासारखे भरधाव वाहने चालवत असतात. मळ्यातील फोर पिलर चौकापासून (नेवगीनगर) ते पाटो पुलापर्यंतचा रस्ता खडबडीत झालेला आहे, तेथे पाणी साचते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com