पणजी: केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल मंत्रालयात वीज खात्याच्या कारभाराचा आढावा घेतल्यानंतर खात्याने राज्यात वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर देण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे. सुरवातीला शहरी भागात असे स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येणार असून त्यासाठीची निविदा लवकरच मागवली जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
देशभरात वीज वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल मंत्रालयात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर राज्याच्या वीज खात्याने स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया गतीने सुरू केली आहे. यासाठी लवकरच निविदा मागवली जाणार असून या तंत्रज्ञानामुळे ग्राहक आणि वीज वितरण करणारे वीज खाते यांना अनेक फायदे होणार आहेत.
स्मार्ट मीटर हे पारंपरिक वीज मीटरच्या तुलनेत अधिक सुसंगत व तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपकरण आहे. हे मीटर ग्राहकाच्या वीज वापराची नोंद अचूकपणे घेतात आणि ती माहिती थेट वीज खात्याच्या प्रणालीत पाठवतात. त्यामुळे अंदाजे बिलापेक्षा प्रत्यक्ष वापरावर आधारित अचूक बिल ग्राहकांना मिळते.
वीज वापराचे त्वरित निरीक्षण
मोबाईल अॅपवर मिळणार प्रत्यक्ष वापराची माहिती
वीज बचतीचा विचार शक्य
मीटर रिचार्जसाठी ‘प्रीपेड’ पर्याय
ही उपलब्ध होणार असून, ग्राहक आपल्या बजेटनुसार वीज वापर ठरवू शकतात. बिल पाठवण्यात होणारा उशीर, चुकीचे बिल, किंवा मीटर रिडींगसाठी कर्मचाऱ्याची गरज यावरही पूर्णविराम मिळणार आहे.
थकीत बिलांची समस्या कमी होणार
वीज गळती व बेकायदेशीर वापरावर नियंत्रण
महसुलात होणार वाढ
वितरण प्रणाली सक्षम
मीटर रिडींगसाठी कर्मचाऱ्याची गरज भासणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.