CM Pramod Sawant | Smart City
CM Pramod Sawant | Smart City Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: ‘स्मार्ट सिटी’ कामांच्या पूर्ततेसाठी मिळाला 'हा' नवा मुहूर्त!

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे राजधानी पणजीत पुरता गोंधळ उडाला असून ठिकठिकाणी खोदलेले खड्डे, उखडलेले रस्ते, त्यातून सुरू असलेली वाहतूक, अनेक ठिकाणी बाहेर आलेले गटारीचे पाणी आणि उडणारी धूळ यांच्या त्रासाने पणजीवासी हैराण झाले आहेत.

अशात ही कामे 30 मेपर्यंत पूर्ण केली जातील, असे आश्वासन आधी दिले होते. आता या तारखेत बदल झाला असून 15 जूनपर्यंत ही कामे सुरू राहतील, असे नवे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिले.

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचली आहे. अनेक ठिकाणी गटारींची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे.

अशा स्थितीत मान्सूनपूर्व पाऊस पडल्यास पणजीचे काय होणार, असा गंभीर प्रश्न उभा आहे. आता ही कामे पावसाळ्यानंतर करण्यात येतील, असे म्हणत ही कामे आहेत, त्या स्थितीत बंद करून गुंडाळण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.

अर्थात ही कामेही 30 मे पर्यंत पूर्ण करा, असे सांगितले होते. आता याची मुदत वाढवली असून ती 15 जूनपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज स्मार्ट सिटीचे सर्व कंत्राटदार, जलस्रोत खात्याचे अधिकारी, सल्लागार, साबांखाच्या अधिकाऱ्यांसह विविध खात्यांचे विभागप्रमुखांची बैठक घेऊन ही कामे जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या.

यासाठी कंत्राटदारांना तीन शिफ्टमध्ये अखंडित काम करण्यास सांगितले आहे. आवश्यक तेवढे कामगार घ्या आणि काम पूर्ण करा, यासाठी छोट्या निविदा काढून त्या मंजूर करा, असेही सांगितले आहे. 8 जूनपर्यंत पाऊस अपेक्षित आहे.

तोपर्यंत सर्व मोठी कामे आणि जोडण्या पूर्ण केल्या जातील आणि 8 ते 10 जूनपर्यंत सर्व रस्त्यांचे डांबरीकरण होईल, असे मुख्यमंत्री आज म्हणाले.

सिवरेजचा धोका

स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त मुख्य सिवरेज पाईपलाईन बदलल्याने पणजीतील रस्ते पाण्यात बुडू शकतात, अशी चिंता आज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या मतानुसार स्मार्ट सिटी कार्यक्षेत्रातील आणि आजूबाजूच्या भागातील कामे यांच्यात समन्वयाचा अभाव आहे.

त्याच वेळी जोडणीच्या कामाची निविदा काढणे गरजेचे होते. पणजीत पूर येऊ नये, यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेतली असून मळा येथे नवीन उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन्स आणि गेट बसवले आहेत. त्यामुळे यावेळी मळा भागात पूरस्थिती निर्माण होणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Gas Leakage: गॅस बंद न करता झोपी गेले; वास्कोत गुदमरुन वाराणसीच्या एकाचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

Netravali: नेत्रावळीत शिकार पार्टीचे नियोजन भोवले; कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना काडतूससह रंगेहाथ पकडले

तेलंगणात 2.07 कोटी गोवा बनावटीचे मद्य जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात दारु तस्करी

UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT