Smart City Work Pramod Yadav
गोवा

Panaji Smart City Work: घ्या! पणजीत आणखी एक ट्रक रुतला; 'स्मार्ट सिटी'च्या निकृष्ट कामाचं नवं उदाहरण

गोव्यात सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू आहे. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदलेले दिसत आहेत.

Kavya Powar

Panaji Smart City Work: गोव्यात सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू आहे. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदलेले दिसत आहेत. यामध्ये गेल्या दोन महिन्यात मालवाहतूक ट्रक रस्त्यात रुतण्याचे प्रकार समोर आले.

आजही अशीच एक घटना घडली आहे. पणजीतील सांतीनेज परिसरातील शीतल हॉटेलजवळ एक ट्रक रस्त्यात रुतून पूर्णपणे कलंडल्याने पुन्हा एकदा स्मार्ट सिटीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

शीतल हॉटेल ते काकुलो मॉल या रस्त्यावरील काम सुरू असल्याने दोन्ही बाजूने वाहतूक बंद होती. त्यामुळे रस्त्याच्या एकाच बाजूने दुहेरी वाहतूक सुरू होती. दरम्यान, आज सकाळी एका ट्रकचे चाक रस्त्यात रुतले आणि ट्रक कलंडला. यामुळे तिथे वाहतूक कोंडी झाली आहे.

एकतर सांतीनेजमधील या भागात हॉटेल्स आणि कॉर्पोरेट कार्यालये असल्यामुळे या रस्त्यावर रहदारीचे प्रमाण जास्त असते.

अशावेळी सकाळी कामाच्या वेळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. माहितीनुसार, आता या घटनेनंतर एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहेत.

जवळपास महिन्याभरापूर्वी याच परिसरात, शीतल हॉटेलजवळच मालवाहतूक करणारा ट्रक रस्त्यात रुतला होता. त्यामुळे या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.

दरम्यान, राज्यात स्मार्ट सिटीची कामे एका बाजूला सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला पणजीवासीय सततच्या खोदकामांमुळे होणाऱ्या धुळीमुळे वाहतूक कोडींमुळे आणि रस्त्यात वाहने खचण्याच्या घटनामुळे वैतागले आहेत.

महानगरपालिका व ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकाऱ्यांनी आमच्या संयमाचा अंत पाहून आम्हाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नये, अशा शब्दांत नागरिक चीड व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT