Sanquelim Municipal Council Election 2023: रुसवे-फुगवे, मनधरणी हे भाजपसमोर आव्हान; साखळीत मुख्यमंत्र्यांचा प्रचारावर जोर

साखळी पालिकेच्या 10 प्रभागांसाठी 5 मे रोजी मतदान
Sankhlim Municipality Election 2023
Sankhlim Municipality Election 2023Dainik Gomantak

Sanquelim Municipal Council Election 2023: अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या साखळी पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा हा विधानसभा मतदारसंघ आणि बालेकिल्ला असल्याने त्यांनी प्रचारात स्वत: उतरून जोर लावला आहे, तर विरोधकांनी भाजपकडून सुडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे.

सध्या तरी भाजपसमोर अनेक प्रभागांमध्ये एकापेक्षा जास्त असलेल्या उमेदवारांची मनधरणी आणि रुसवे-फुगवे हेच आव्हान बनले आहे.

साखळी पालिकेच्या 10 प्रभागांसाठी 5 मे रोजी मतदान होत असून भाजप आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांसह 31 जण राजकीय भवितव्य आजमावत आहेत.

2 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. साखळी पालिका आपल्याकडेच यावी, यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

Sankhlim Municipality Election 2023
Pernem Crime News : ‘त्या’ अनोळखी तरूणीच्या खून प्रकरणी पेडणे पोलिसांची सिंधुदुर्गात चौकशी

भाजपची प्रचाराची धुरा प्रत्यक्ष प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आपल्याकडे घेतली आहे. त्यांना मंडलाध्यक्ष गोपाळ सुर्लकर, कालिदास गावस, संजय नाईक आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत या साथ देत आहेत.

राज्याच्या कारभाराची सूत्रे भाजपकडेच असल्याने सत्ताधारी पक्षाची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी साखळीत अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरले.

या निवडणुका पक्षीय पातळीवर होत नसल्या तरी भाजपने अधिकृत पॅनेल जाहीर केले आहे. हे करताना त्यांनी अनेक उमेदवारांना दुखावले आहे. अधिकृत उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांची मनधरणी, रूसवे-फुगवे हे सध्या तरी भाजपसमोरचे आव्हान बनले आहे.

होमपीचवर तळ

मुख्यमंत्री राज्यातील कार्यक्रम लवकर संपवून साखळी गाठत आहेत. सकाळी ते मतदारांच्या भेटीगाठी घेण्याबरोबरच गुप्त बैठकाही घेत आहेत. ‘टुगेदर फॉर साखळी’ पॅनेलनेही प्रचार आक्रमकपणे सुरू केला आहे.

गत निवडणुकीत या पॅनेलने 12 पैकी 10 उमेदवार निवडून आणून भाजपला धक्का दिला होता. परंतु नंतर यापैकी एकाही नगरसेवकाने फुटून भाजपला साथ दिली नाही, याचे शल्य भाजपला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच, अशी तयारी भाजपने केली आहे.

Sankhlim Municipality Election 2023
Goa Accident News : वालंकिणीहून परतणाऱ्या मिनी बसला रामनगर येथे अपघात

‘फिफ्टी फिफ्टी’

‘टुगेदर फॉर साखळी’तर्फे धर्मेश सगलानी, प्रवीण ब्लेगन, राजेश सावळ जोरदार प्रयत्न करत आहेत. अनेक प्रभागांतील तिरंगी आणि बहुरंगी लढतींमुळे ही निवडणूक ‘फिफ्टी-फिफ्टी’ असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

विरोधकांनी भाजप सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. याचा प्रत्यक्ष मतदारांवर किती परिणाम होतो, हे निकालानंतरच करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com