Panaji Road Closure Dainik Gomantak
गोवा

Panaji Road Closure: पणजीत वाहतुकीचे वाजणारा बारा; राजधानीतील पाच रस्ते 19 दिवस राहणार बंद

Panaji Smart City Work: स्मार्ट सिटीची शहरात सध्या अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. ३१ मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करणार असल्याचे आयपीएससीडीएलने यापूर्वी जाहीर केले आहे.

Sameer Panditrao

पणजी: स्मार्ट सिटीच्या कामांचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. त्यामुळे मध्य पणजीतील रस्ते तात्पुरते बंद केले जाणार आहेत. ता. ९ ते २८ या फेब्रुवारी या कालावधीत रस्ते काही काळासाठी बंद असतील, या काळात वाहतूक कोंडी होईल, असे इमेजीन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडतर्फे कळविण्यात आले आहे.

स्मार्ट सिटीची शहरात सध्या अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. ३१ मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करणार असल्याचे आयपीएससीडीएलने यापूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या कामे पूर्णत्वाकडे आयपीएससीडीएलने नेमलेल्या कंत्राटदरा कंपन्यांनी लक्ष पुरविले आहे. तिसऱ्या टप्प्यातील १ हजार ४१५ मीटर क्षेत्रातील कामे हाती घेतली जाणार आहेत.

हा सर्व भाग मध्य पणजीत येतो. त्यासाठी या महिन्यातील २० दिवसांसाठी रस्ते तात्पुरते बंद असणार आहेत, असे नागरिकांच्या माहितीसाठी कळविले आहे. मुख्य रस्त्यांना जोडणारे जोड पाच रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. या मार्गावरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता त्यांनी या कामांना सहकार्य करावे, असे आवाहन आयपीएससीडीएलने केले आहे.

अशी होईल वाहतूक

जनरल बेर्नाड म्युडिस रोड वापरणाऱ्यांनी डॉन बॉस्को स्कूल मार्गे स्वामी विवेकानंद रोड आणि एमजी रोडने डी.बी. रोडला जावे. तर एमजी रोड वापरणाऱ्यांनी वूडलँड शोरूमजवळील एमजी रोडवर जाण्यासाठी स्वामी विवेकानंद रस्त्याचा वापर करावा.

या रस्‍त्यांचे काम!

जनरल बेर्नाडो म्युडिस रोड ः गीता बेकरी ते आयनॉक्स

(५३५ मीटर).

एमजी रोड ः युको बँक ते विनंती हॉटेल (३८० मीटर)

कॉस्ता अल्वारीस रोड ः आल्फ्रान प्लाझा ते डी.बी. रोड जंक्शन (२०० मीटर)

टॉम वाईन स्टोअर ते डी.बी.रोड जंक्शन

(२०० मीटर)

कॉस्ता अल्वारिस रोडवरील दोन अंतर्गत रस्ते

(१०० मीटर)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Word Etymology: ‘बाप’ हा शब्द सध्याच्या कुंळबी भाषेतील ‘आब’ या ‘वडील’ अर्थाच्या शब्दाचे रूप; कोकणी शब्दांचे कुरुंब मूळ

'CM सावंत राजीनामा द्या!', हडफडे दुर्घटनेनंतर काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला; सत्तेत राहण्याचा अधिकार नाही म्हणत दिला अल्टिमेटम

Goa Ritual Theatre: जेव्हा भक्ताच्या अंगात ‘भार’ येतो, तेव्हा तो सामान्य माणूस न राहता देवतेचे रूप घेतो, हेच मूळ 'विधीनाट्य'

Pooja Naik: 'पूजा नाईक'सारख्या व्यक्तीकडे 8 कोटी रुपये सापडतात, याचा अर्थ काय?

Goa Live News: हडफडे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तातडीची उपाययोजना; उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून नियंत्रण कक्ष स्थापन

SCROLL FOR NEXT