Panjim Smart City
Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Smart City Panjim: अमृत मिशन अंतर्गत स्मार्ट सिटी बनवण्याच्या नादात नागरिकांना त्रास; ‘पणजी’मध्ये जीवघेणे खड्डे

दैनिक गोमन्तक

Panjim Smart City: केंद्र सरकारच्या अमृत मिशन अंतर्गत पणजीला स्मार्ट सिटी बनवण्याचा नादात नागरिकांना जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडावे लागते. उखडलेल्या, अडवलेल्या रस्त्यांमुळे जनतेची दैना होत आहे.

त्यात कहर म्हणजे सांतिनेज-पणजी येथील पीडब्ल्यूडी कार्यालयाजवळ काल दुपारच्या सुमारास चिरे भरलेला ट्रक अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्मार्ट सिटीच्या खड्ड्यातच उलटा झाला. यावेळी खड्ड्यात काम करणाऱ्या मजुरांवर चिरे पडल्याने 4 जण जखमी झाले.

राजधानी पणजीत स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे ठिकाठिकाणी रस्त्याच्या बाजूने चर खोदण्यात येत आहेत. काम झाल्यावर त्यावर माती घालण्यात येते. मात्र, अवजड वाहने त्या मातीवरून गेल्यावर माती खचल्याने वाहने अडकून पडण्याची तसेच कलंडण्याचे प्रकार घडत आहेत.

शहरातील खोदकामामुळे रस्त्यांवर खड्डे असून वाहनांचे किरकोळ अपघात तसेच धुळीच्या प्रदूषणाला सामोरे जावे लागत असल्याने वाहनचालक, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

सांतिनेज अपघाताची बातमी कळताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, वरद म्हार्दोळकर तसेच महापौर रोहित मोन्सेरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

असा घडला अपघात

स्‍मार्ट सिटीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा चिरे भरलेला ट्रक सांतिनेज येथून ताळगावच्या दिशेने जात होता. पीडब्ल्यूडी कार्यालयाजवळ पोहचला असता ट्रकचे एक चाक बाजूला खोदलेल्या चरामध्ये गेला.

त्यामुळे ट्रक कलंडल्याने रस्त्याच्या बाजूने काम करत असलेल्या मजुरांवर हे चिरे पडले. अपघात घडताच ट्रकचालक दर्शनी काच फोडून तो बाहेर आला व लोकांकडून मारहाण होईल या भीतीने पसार झाला. जखमी मजुरांच्या डोक्याला तसेच शरीराला जखमा झाल्या आहेत.

सांतिनेज येथील अपघातात सुदैवाने मजुरांचा जीव वाचला ही देवाची कृपा. स्मार्टसिटीचे हे काम ‘स्मार्ट’ नव्हेतर मोठा घोटाळा आहे. सामान्यांची सुरक्षा करण्यात सरकारला अपयश आल्याचेच हे उदाहरण आहे.

या योजनेखाली सुरू असलेल्या कामांच्या खर्चाची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी. कामाची श्‍वेतपत्रिका काढावी. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

सांतिनेजमधील दुपारी घटना जी घटना घडली, तो भाग ताळगाव पंचायत आणि मतदारसंघात पडतो. त्याठिकाणी महापौर रोहित मोन्सेरात पोहोचले होते, त्याशिवाय ताळगाव पंचायतीचे पंचही पोहोचले होते.

पणजी शहरात ती घटना असती तर आपणास जाणे भाग होते. परंतु आपणाविषयी कोण काय बोलतो, याकडे आपण लक्ष देत नाही. - बाबूश मोन्सेरात, महसूल मंत्री.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT