Panaji Smart City पणजी स्मार्ट सिटी होण्यासाठी किती वर्षे गेली. त्यात आमदारही बदलले गेले. पणजीतील नागरिक सध्या मोठ्या त्रासाला तोंड देत आहेत. सध्या पणजीत सुमार दर्जाचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटी हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
काँग्रेस भवनात पत्रकारांशी शुक्रवारी वार्तालाप झाला. त्यवेळी त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला.
पणजीतील आमदार उच्च न्यायालयाने घेतलेल्या दखलीबद्दल पणजीकरांना दिलासा मिळाला आहे, असे म्हणत असतील, तर त्यात सत्तेत असणाऱ्या प्रत्येक घटकांमध्ये समन्वय नसल्याचेच स्पष्ट होते आहे. स्मार्ट सिटीचे कार्यालयात कर्मचारी नसतो.
आपण गेल्या अधिवेशनात स्मार्ट सिटीविषयी प्रश्न टाकला आहे, परंतु या अधिवेशनात तो आला नाही. परंतु पुढील अधिवेशनात आपण त्याविषयी निश्चित आवाज उठवू, असे आलेमाव म्हणाले.
काँग्रेसचे दोन आमदार भाजपमध्ये जाणार आहेत, असे सांगणाऱ्या आम आदमी पक्षाच्या पत्रकार परिषदेस किती आमदार होते? असा सवाल करीत आलेमाव म्हणाले, आपणही आपचा एक आमदार भाजपमध्ये जाणार असे म्हणू शकतो.
परंतु काही वावड्यांवर विश्वास ठेवू नये, आपण लोकांचे प्रश्न मांडण्याकडे लक्ष देतो, असे त्यांनी नमूद केले. युरी आलेमाव हे विरोधी पक्षनेता आहे आणि आपली भूमिका ही सर्व विरोधी आमदारांना एकत्रित घेण्याची आहे.
राज्यात विनापरवाना कॅसिनो पूर्णवेळ सुरू आहेत, ते सरकारने थांबवावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. रस्त्याच्या बाजूचे गाडेकार आहेत, त्यांना ‘जी-20’मुळे हटविण्यात आले आहे, यावर आलेमाव म्हणाले, ‘जी-20’ हा कार्यक्रम राज्यासाठी महत्त्वाचा आहे.
परंतु स्थानिकांना त्यातून बाहेर काढणे योग्य नाही. 300 कोटी ‘जी-20’साठी आले आहेत. केवळ आठ बैठका होणार आहेत. लाडली लक्ष्मी असो किंवा क्रीडापटू आहेत, त्यांना राबविण्यात येणाऱ्या योजनांचा पैसा वेळेत नाहीत.
गुन्हेगारी नष्ट करा
रंगरंगोटी आणि कॅसिनोंच्या नावावर कापड लावून काही होणार नाही. तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारी नष्ट केली पाहिजे.
राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे सांगत राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणावर आलेमाव म्हणाले, सरकार सांगते एक आणि करते एक.
प्रत्येक गोंयकाराच्या डोक्यावर 1 लाख 80 हजारांचे कर्ज आहे. परंतु महसूल वाढीसाठी काय नियोजन आहे. खाणींचा लिलाव झाला, खाणी केव्हा सुरू होणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.