Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : धूळ नियंत्रणासाठी उद्यापासून पणजीतील रस्त्यांची साफसफाई

Panaji News : न्यायाधीश १ एप्रिल रोजी पाहणी करणार

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी शहरातील धुळीच्या प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले होते. त्यानुसार राज्य सरकारने सूचविल्यानुसार इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडने (आयपीएससीडीएल) त्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.

पाणी शिंपडण्याव्यतिरिक्त सोमवार, ता. १ एप्रिलपासून धूळ नियंत्रणासाठी रस्ते साफ करण्याचे काम हाती घेणार असल्याचे आयपीएससीडीएलने कळविले आहे.

शहरातील धुळीच्या प्रदूषणावरून दोन स्वतंत्र जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल झाल्या होत्या. खंडपीठाने या याचिकांची दखल घेत २७ मार्च रोजी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी करून धूळ प्रदूषणाची माहिती देण्यास सांगितले. त्याशिवाय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी १ एप्रिल रोजी स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी करू, असे स्पष्ट बजावले आहे.

आयपीएससीडीएलने दिलेल्या माहिती पत्रकात म्हटले आहे की, अलीकडे पणजीतील रहिवाशांना स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे उद्भवणाऱ्या धुळीच्या प्रदूषणासंदर्भातील चिंता दूर करण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे.

धुळीच्या प्रदूषणाला सामोरे जाण्यासाठी आयपीएससीडीएल आणि मेसर्स बागकिया, मेसर्स एमव्हीआर आणि मेसर्स बन्सल यासारख्या कंत्राटी एजन्सींना विविध उपायांची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट बजावलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT