Siddhi naik Case Dainik Gomantak
गोवा

सिद्धी नाईक मृत्‍यू प्रकरणात नऊ महिने उलटले तरी तपास अधांतरीच

न्याय मिळवून देण्याचा कुटुंबीयांचा आक्रोश; अपराध्याला शोधण्यात पोलिसांना अपयश

दैनिक गोमन्तक

कळंगुट : हळदोणे येथील युवती सिद्धी नाईक मृत्‍यू प्रकरणात नऊ महिने उलटले तरी अद्याप तपास लागलेला नाही. अपराध्याला समोर आणण्यास तपास यंत्रणांना सपशेल अपयश आले आहे. त्‍याबद्दल मृत सिद्धीचे वडील संदीप नाईक तसेच कुटुबीयांकडून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणातील आरोपींना लवकर फासावर लटकविण्याची मागणी नाईक कुटुंबीयांकडून होत आहे. कळंगुट पोलिसांच्या निराशाजनक कामगिरीमुळे या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. आता या प्रकरणाला नऊ महिने उलटले तरी यामागचे गूढ अद्याप गुलदस्त्यात आहे.

एका सामान्य कुटुंबातील असलेली सिद्धी नाईक ही युवती कुटुंबाला हातभार लावण्याच्या उद्देशाने पर्वरी येथील एका नामांकित मॉलमध्ये कामाला होती. 11 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी नऊच्या दरम्यान कामावर जाण्यासाठी निघालेल्या सिद्धीला तिच्या वडिलांनी आपल्या दुचाकीवरून गिरी-म्हापसा येथील बसथांब्यावर सोडले होते. त्या दिवसापासून बेपत्ता असलेल्या सिद्धीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी 12 ऑगस्टच्या भल्या पहाटे कळंगुटच्या समुद्र किनारी अर्धनग्न अवस्थेत सापडला होता.

कळंगुट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून त्याच दिवशी सिद्धीचा बांबोळीच्या शवागारात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता. दरम्‍यान, सिद्धी नाईक हिच्‍या मृत्‍यूला 11 मे रोजी नऊ महिने पूर्ण होत आहेत.

सिद्धीच्‍या मृत्‍यूचा अहवाल हाती पडताच त्याच दिवशी घाईगडबडीत तिच्‍या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. बांबोळीच्या शवागारातून मिळालेल्या अहवालानुसार तिच्या शरीरावर चार जखमा आढळून आल्या होत्या. पैकी दोन जखमा तिच्या पायावर होत्या. त्यामुळे आपल्या मुलीच्या मृत्‍यूप्रकरणात घातपात असल्याचे सांगत वडील संदीप नाईक यांनी 28 डिसेंबरला कळंगुट पोलिस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तत्‍कालीन पोलिस निरीक्षक नालास्को रापोझ यांनी या प्रकरणाचा तपास करताना हयगय केल्याचा ठपका ठेवत सेवेतून निलंबन करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT