'विर्नोड्यात सर्व रस्ते पावसापूर्वी चकाचक होणार'

आमदार प्रवीण आर्लेकर: धनगरवाडीत डांबरीकरण कामाला सुरवात
MLA Praveen Arlekar inaugurating the road
MLA Praveen Arlekar inaugurating the road Dainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: चांगले रस्ते असणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. रस्त्याचे जाळे विणल्यास दळण-वळणाच्या सुविधा निर्माण होतात. विर्नोडा पंचायत क्षेत्रातील वानरमारे, धनगरवाडी या परिसरात पक्का रस्ता असावा, अशी येथील ग्रामस्थांची खूप वर्षांची मागणी आता पूर्णत्वास येत आहे. विर्नोड्यातील सर्व रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात येईल, अशी माहिती आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली.

धनगरवाडा, वानरमारे परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरण कामाला श्रीफळ वाढवून सुरवात केल्यानंतर आमदार आर्लेकर बोलत होते. यावेळी विर्नोड्याच्या सरपंच अपर्णा परब, माजी सरपंच मंगलदास किनळेकर, पंच सदस्य भरत गावडे, शैलेश परब व ग्रामस्थ उपस्थित होते.

MLA Praveen Arlekar inaugurating the road
कचऱ्याच्‍या विल्‍हेवाटीसाठी मडगाव पालिकेला हवी जागा

माजी सरपंच मंगलदास किनळेकर, भरत गावडे यांनी रस्त्याचा काही भागाला जमीनदाराचा ना हरकत दाखला न मिळाल्याने वानरमारे, धनगरवाडीतील रस्त्याचे डांबरीकरण यापूर्वी होऊ न शकल्याचे सांगितले. विद्यमान आमदार यांनी याची दखल घेत प्रथम येथील कामाला महत्त्व दिल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुकही गावडे व किनळेकर यांनी केले.

आमदार आर्लेकर म्हणाले, गतवेळच्या लोकप्रतिनिधींनी काय केले काय नाही केले, याची चर्चा न करता ग्रामस्थांनी आपल्या पंचायत क्षेत्रातील समस्या आपल्या निदर्शनास आणून द्याव्यात, आपणत्या सोडविण्यास कटिबद्ध आहे. लोकांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून निवडून दिले असल्याने जनतेच्या कामाला माझे प्रथम प्राधान्य राहिल, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com