Sky Lantern Selling  Dainik Gomantak
गोवा

Sky Lantern Selling : आकाशकंदील विकून संसाराला हातभार; पागी कुटुंबाचा आदर्श

Sky Lantern Selling पर्यावरण रक्षणाचा संदेश

गोमन्तक डिजिटल टीम

सुभाष महाले

Sky Lantern Selling : काणकोण, आज बाजारात चिनी बनावटीच्या आकाश कंदिलांबरोबरच थर्मोकोल व प्लास्टिकचे आकाशकंदील बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, तामने- लोलये येथील सरोजा पागी, उल्हास पागी व मुले गेली आठ वर्षे पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवून विकत आहेत.

दरवर्षी सुमारे अडीचशे आकाश कंदील कुटुंबीय बनवतात. कोणत्याच प्रकारचे पर्यावराणाला हानिकारक साधनांचा वापर आकाश कंदिलासाठी करत नसल्याचे उल्हास यांच्या पत्नी सरोजा पागी यांनी सांगितले.

आमच्या आकाश कंदिलाला काणकोणचे नागरिक पसंती देतात,असेही पागी यांनी सांगितले. सकाळी ६ वाजता उठून एक आकाश कंदील बांधणी सुरू केल्यानंतर एका दिवसात एक आकाश कंदील रंगीत कागद लावून तयार होतो.आकाश कंदिलांची किमंत अडीचशेपासून चारशे रूपयांपर्यंत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार ही किंमत ठरत असते.

यंदा तुळशीच्या आकाराचे ग्राहकांच्या मागणीनुसार आकाश कंदील तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी गोवा बागायतदार संस्थेच्या काणकोण शाखेत सुमारे ७० ते ८० आकाश कंदील विक्रीसाठी ठेवण्यात येतात, त्यांची दरवर्षी विक्री होते. मात्र विक्री न झालेले आकाशकंदील नरकचतुर्दशीच्या पहिल्या दिवशी परत आणले जात असल्याचे सरोजा पागी यांनी सांगितले.

या कामात पागी यांचे संपूर्ण कुटुंब गेले एक महिना व्यग्र असते. आठ वर्षात रंगीत कागद, गोंद यांच्या किंमती मध्ये दुपटीने वाढ झाली आहे त्यामुळे आकाश कंदील किंमतीमध्ये वाढ करणे अपरिहार्य ठरले असल्याचे उल्हास पागी यांनी सांगितले.उल्हास पागी हे चांगले बांधकाम व्यावसायिक आहेत.ते सिमेंट प्लास्टर कलेत तरबेज आहेत. मात्र, आकाश कंदील तयार करून विकण्याचा जोड व्यवसाय ते करीत आहेत.

ग्राहकांचा चांगला प्रतिसाद !

कारवार मडगाव हमरस्त्यावरील वाहतूक माशे ते चाररस्ता येथून मनोहर पर्रीकर बगल मार्गावरून वळविण्यात आल्याने मडगाव ते कारवार तसेच कारवार ते मडगाव असा प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी उल्हास पागी यांचा पुत्र सुरज पागी दापट- माशे येथे आकाशकंदील विक्रीसाठी ठेवत आहे. त्याला ग्राहकांचा प्रतिसाद लाभत असल्याचे सरोजा पागी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT