Margao Crime News Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: संशयिताचे स्‍केच, ‘ओमनी’चे छायाचित्र जारी! मडगाव अपहरण प्रकरण; आणखी एकजण पोलिसांच्‍या रडारवर

Margao Kidnapping Case: मडगावातील साेन्‍याचे व्‍यापारी कुणाल रायकर याच्‍या अपहरणाचा प्रयत्‍न केल्‍याच्‍या प्रकरणाच्‍या तपासाला मडगाव पोलिसांनी वेग आला असून या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताचे रेखाचित्र (स्‍केच) तसेच ‘ओमनी’ कारचे छायाचित्र जारी केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Businessman Kidnapping Case

मडगाव: मडगावातील साेन्‍याचे व्‍यापारी कुणाल रायकर याच्‍या अपहरणाचा प्रयत्‍न केल्‍याच्‍या प्रकरणाच्‍या तपासाला मडगाव पोलिसांनी वेग आला असून या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताचे रेखाचित्र (स्‍केच) तसेच ‘ओमनी’ कारचे छायाचित्र जारी केले आहे.

या प्रकरणात मडगाव पोलिसांनी एकाची कसून चाैकशी केल्‍याची माहिती प्राप्‍त झाली असून आणखी एक संशयित पोलिसांच्‍या रडारवर आहे. दरम्‍यान, दुसऱ्या एका प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांनी नीलेश वेर्णेकर याच्‍याकडून एक बंदूक जप्‍त केली आहे.

सुमारे २० दिवसांपूर्वी आके येथे दिवसाढवळ्या हा अपहरणाच प्रयत्‍न झाला होता. मात्र, कुणाल रायकर याने अपहरण करणाऱ्याशी झटापट केल्‍याने हा अपहरणाचा प्रयत्‍न फसला हाेता. याच प्रकरणात आता मडगाव पोलिसांनी एका अज्ञाताच्‍या विरोधात लुकआऊट नोटीस काल जारी केली. या नोटिशीबरोबर संशयिताचे स्‍केच जोडलेले असून दुसऱ्या एका लुकआऊट नोटिसीत रस्‍त्‍यावरुन जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्‍या मारुती ओमनी गाडीचा फोटो प्रसिद्ध केला आहे. या ओमनीचा नंबरही त्‍यात दिसतो.लाेकांनी माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बंदूक जप्त

दरम्‍यान, आणखी एका वेगळ्‍या प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांनी नीलेश वेर्णेकर या संशयिताकडून एक पिस्‍तूल जप्‍त केले आहे. वेर्णेकर याच्‍या विरोधात यापूर्वी एकावर गोळीबार केल्‍याचा आरोप करण्‍यात आला होता. या प्रक़रणी त्‍याच्‍या विरोधात गुन्‍हाही नाेंद झालेला आहे. सदर संशयिताच्‍या पत्‍नीकडे बंदूक असल्‍याची माहिती मिळताच काल ती जप्‍त करण्‍यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT