ganpati stotra record Dainik Gomantak
गोवा

6 वर्षांच्या रमाने 50 सेकंदात पूर्ण केले 8 श्लोक; गोव्याची चिमुकली बनली 'ग्रँडमास्टर'! 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नाव

Asia Book of Records: अवघ्या ५० सेकंदांच्या वेळेत गणपती स्तोत्रातील ८ श्लोकांचे शुद्ध पठण करून रमाने 'एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये नाव कोरले

Akshata Chhatre

Ganpati Stotra Record Goa: गोव्यातील 'वन' या छोट्याशा गावात राहणाऱ्या सहा वर्षांच्या रमा विराज भिडे हिने आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेने आणि स्पष्ट उच्चारांनी संपूर्ण जगाला थक्क केले आहे. अवघ्या ५० सेकंदांच्या विक्रमी वेळेत संपूर्ण गणपती स्तोत्रातील ८ श्लोकांचे शुद्ध पठण करून रमाने 'एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्स' (Asian Book of Records) मध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले. या कामगिरीसाठी तिला 'ग्रँडमास्टर' (Grand Master) या सन्माननीय पदवीने गौरविण्यात आले आहे.

५० सेकंदांचा अविश्वसनीय चमत्कार

रमाचा जन्म १७ जून २०१९ रोजी झाला असून, सध्या तिचे वय ६ वर्षे ४ महिने आहे. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी तिच्या या विक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गणपती स्तोत्रासारखे कठीण संस्कृत शब्द असलेले स्तोत्र रमाने केवळ ५० सेकंदात कोणताही अडखळता पूर्ण केले. तिची एकाग्रता आणि शब्दांची स्पष्टता पाहून परीक्षकही थक्क झाले.

गावासाठी आणि राज्यासाठी अभिमानाचा क्षण

रमाच्या या यशामुळे तिच्या 'वन' गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिच्या या यशाची दखल घेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तिचे विशेष कौतुक केले आहे. "एवढ्या लहान वयात रमाने मिळवलेले हे यश राज्यातील इतर मुलांसाठी प्रेरणादायी आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी तिला शाबासकी दिली.

कुटुंबाची साथ

रमाच्या या प्रवासात तिचे आई-वडील आणि कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. रमाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हे कठीण आव्हान लीलया पेलले. एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्सने तिला प्रमाणपत्र आणि 'ग्रँडमास्टर' पदक देऊन सन्मानित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बांगलादेशात क्रूरतेचा कळस! 50 वर्षीय हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करुन दिलं पेटवून; 31 डिसेंबरची रात्र ठरली 'काळरात्र'

VIDEO: कळंगुटमध्ये पर्यटकांपेक्षा तंबाखू-दारु पिऊन फिरणाऱ्यांचीच 'तोबा' गर्दी, सरत्या वर्षाला अशा प्रकारे निरोप; गर्दीचे विदारक वास्तव मांडणारा व्हिडिओ चर्चेत

New Year 2026: इंग्रजी वर्षाची सुरुवात सूर्यनमस्कार आणि योगाभ्यासाने! तांबडी सुर्ला महादेव मंदिरात शेकडो तरुणांचा उत्साह

पर्यटकांच्या फटाक्यांमुळे मच्छिमाराचे 'रापण' खाक; मोठ्या आर्थिक नुकसानानंतर भरपाईची मागणी!

Goa Live News: कोकेन बाळगल्याप्रकरणी नायजेरियन नागरिकाला एक वर्षाची सक्तमजुरी

SCROLL FOR NEXT