Bits Pilani Goa Dainik Gomantak
गोवा

'सूर्यमालेबाहेर सहा ग्रहांवर मानवी जीवन शक्य', गोव्यातील BITS पिलानीमधील संशोधकांचा दावा

आतापर्यंत, सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव राहण्यायोग्य ग्रह असल्याचे सर्वांना ज्ञात आहे

Pramod Yadav

आतापर्यंत, सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव राहण्यायोग्य ग्रह असल्याचे सर्वांना ज्ञात आहे. पण सूर्यमालेबाहेर राहण्यायोग्य ग्रह आहेत का? याबाबत सात्याने संशोधक शोध घेत आहेत. त्यासाठी मंगळसह, विविध ग्रहांवर अनेक चाचण्यादेखील केल्या जात आहेत.

गोव्यातील BITS पिलानी गोवा कॅम्पस देखील यात मागे नाही. सूर्यमालेबाहेर मानवी अधिवास शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना संशोधकांना सहा असे ग्रह सापड्यालाचा दावा त्यांनी केला आहे.

BITS पिलानी गोवा कॅम्पस येथील संशोधकांनी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, बंगलोरच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अल्गोरिदमद्वारे सूर्यमालेबाहेरील राहण्यायोग्य सहा संभाव्य ग्रह शोधून काढले आहेत.

'सूर्यमालेबाहेर हजारो ग्रह (एक्स्ट्रासोलर ग्रह किंवा एक्सोप्लॅनेट) आहेत. एआयला यापैकी एक किंवा काही एक्सोप्लॅनेटमध्ये मानवी जीवन शक्य असल्चाची संभाव्यता सापडू शकते का? याचे उत्तर शोधण्यासाठी, आम्ही एआय-आधारित अल्गोरिदम तयार करून याचा अभ्यास केला,' असे संगणक विज्ञान आणि माहिती प्रणाली विभागातील सहयोगी प्राध्यापक प्रा. स्नेहांशू साहा म्हणाले.

या अभ्यासानुसार, पुष्टी झालेल्या जवळपास 5,000 पैकी असे सहा संभाव्य ग्रह आहेत. या ग्रहांचे मूल्यांकन पृथ्वीशी समानतेवर आधारित आहे. पृथ्वी हा एक विसंगत ग्रह असून, त्याची वैशिष्ट्ये इतर ग्रहांच्या तुलनेत भिन्न आहेत. संभाव्य ग्रहांमध्ये राहण्यायोग्य पृथ्वीसारखीच वैशिष्ट्ये असू शकतात. अशी शक्यता संशोधकानी व्यक्त केली आहे.

'एकदा संभाव्य राहण्यायोग्य उमेदवाराची ओळख पटल्यानंतर, स्थलांतराचा विचार केला जाऊ शकतो, तसेच व्यापार आणि वाणिज्य संबधित गोष्टी स्थापित करण्याचा विचार करू शकतो. कदाचित नव्याने शोधलेल्या राहण्यायोग्य ग्रहाच्या संसाधनांचा देखील वापर केला जाऊ शकतो. पण, ही फार पुढची गोष्ट आहे.' असे वरिष्ठ BITS प्राध्यापक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT