Viral Video: याला म्हणतात खरी जिद्द! हात नसतानाही पायाने बाईक चालवून त्याने नियतीलाच आव्हान दिलं, पठ्ठ्याचा जोश पाहून सर्वच हैराण

Viral News: अनेकदा आपण रस्त्यावरून प्रवास करताना असे काही क्षण पाहतो जे आपले लक्ष वेधून घेतात.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

अनेकदा आपण रस्त्यावरून प्रवास करताना असे काही क्षण पाहतो जे आपले लक्ष वेधून घेतात. काही वेळा असे प्रसंग दुर्मिळ असल्याने लोक त्यांचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर करतात. काही सेकंदांत हे व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनतात आणि झपाट्याने व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आला आहे, ज्यात एका व्यक्तीने दाखवलेले कौशल्य आणि आत्मविश्वास पाहून सगळे थक्क झाले आहेत.

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दोन्ही हातांशिवाय बाईक चालवताना दिसतो. सामान्यतः सायकल चालवण्यासाठी हातांची गरज असते, पण या व्हिडिओतील व्यक्ती मात्र हातांशिवाय इतक्या सहजतेने सायकल चालवत आहे की पाहणाऱ्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. त्याच्या शरीरसंतुलनाची कमाल पाहून सोशल मीडियावर लोक कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Viral Video
Goa Politics: 'अभियंत्याला पोलिसांनी नेले, वीज मंत्री काय करीत आहेत'? पाटकरांचा सवाल; अभ्यास करण्याचा ढवळीकरांना सल्ला

हा व्हिडिओ X (पूर्वी ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर @ChoudhriSandy नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यासोबत कॅप्शन देण्यात आले आहे. “हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकणार नाही.”व्हिडिओ पाहिल्यानंतर हजारो लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका वापरकर्त्याने लिहिले, “इथे चालणेही अवघड आहे, पण हा माणूस तर दोन्ही हातांशिवाय सायकल चालवत आहे!” दुसऱ्याने लिहिले, “त्याच्या धाडसाला सलाम.” तिसऱ्याने आश्चर्याने विचारले, “हे नेमकं शक्य तरी कसं आहे?” तर चौथ्याने लिहिले, “तो मृत्यूशी खेळत आहे.”

Viral Video
Goa Crime: मालमतेच्या वादातून जबरी मारहाण, मृतदेह सापडला गंभीर अवस्थेत; 3 कामगारांना अटक, मुख्‍य सूत्रधार बेपत्ता

हा व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये सध्या जबरदस्त चर्चा सुरु आहे. काहीजण त्याच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत, तर काहीजण त्याच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. मात्र एक गोष्ट नक्की. या व्हिडिओने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की, मर्यादा फक्त मनात असतात; जिद्द आणि इच्छाशक्ती असेल, तर काहीही अशक्य नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com