Goa Medical College Hospital  Dainik Gomantak
गोवा

Goa News: बाळाचा मृत्यू सहन नाही झाला, बापाने GMC तच सातव्या मजल्यावरुन केला उडी घेण्याचा प्रयत्न

Goa Medical College Hospital: बाळाच्या पित्याने सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला.

Pramod Yadav

बांबोळी: येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या सहा महिन्याचा बाळाचा मृत्यू झाला. बाळाचा मृत्यू सहन न झाल्याने बापाने गोमेकॉतच जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.

पिता रुग्णालयाच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना वाचवण्यात आले. मंगळवारी (०१ ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता ही घटना घडली.

बांबोळी रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये ही घटना घडली. कर्नाटकाच्या एका व्यक्तीचे सहा महिन्यांचे बाळ रुग्णालयात उपचाराधीन होते. उपचारादम्यान बाळाचा मृत्यू झाला. दरम्यान, बाळाचा मृत्यू पिता सहन करु शकला नाही.

बाळाच्या पित्याने सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण, यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या गोवा मानव संसाधन विकास महामंडळच्या कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीचे प्राण वाचवले. GHRDC च्या कर्मचाऱ्यांनी सातव्या मजल्यापर्यंत व्यक्तीचा पाठलाग करुन त्यांना उडी मारण्यापासून रोखले.

गोवा मानव संसाधन विकास महामंडळचे कर्मचारी विश्वजीत देसाई आणि विनय गांवकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT