Traffic Traffic Problem Dainik Gomantak
गोवा

Siolim: वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शिवोलीकर त्रस्त

मांद्रेपासून हरमल-केरीपर्यंंत जाणारी वाहतूक शिवोलीच्या एकेरी मार्गात वळवण्यात आली आहे. मात्र, रस्ता अरूंद असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.

दैनिक गोमन्तक

Siolim: तीन महिन्यांपासून शिवोली तसेच परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे चालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. संबंधितांनी याबाबतीत तत्काळ उपाययोजना आखण्याची जोरदार मागणी होत आहे.

दोन महिन्यांपासून सडये-शिवोली पंचक्रोशीला जोडणाऱ्या जोडरस्त्याचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे म्हापसा शहरापासून चोपडे-मोरजी आणि मांद्रेपासून हरमल-केरीपर्यंंत जाणारी वाहतूक शिवोलीच्या एकेरी मार्गात वळवण्यात आली आहे. मात्र, रस्ता अरूंद असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.

या भागातील तापदायक वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी सोमवारी सकाळी मार्ना शिवोलीच्या पंचायत सभागृहात शिवोलीच्या आमदार दिलायला आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पंचायत मंडळाची बैठक झाली आहे. यावेळी लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्‍वास लोबो दाम्पत्यांनी दिले.

वाहतुकीची कोंडी सुधारण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्‍यक आहे. मार्ना बाजारपासून ते थिएटर जंक्शन आणि तेथून चोपडे पुलाच्या पायथ्यापर्यंत थिएटर जंक्शनपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्याशिवाय वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी सांघिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. - विल्यम फर्नांडिस, उपसरपंच, शिवोली

सडये-शिवोली पंचक्रोशीला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न गेली पंचवीस वर्षे अधांतरी होता. लोकांनी मागणी केल्यानंतर आमदार दिलायला लोबोंच्या पुढाकाराने सध्या येथील जोडरस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत हा जोडरस्ता नियमित वाहतुकीसाठी खुला होईल. तेव्हा या भागातील वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.- नीलेश वायंगणकर, उपसरपंच, सडये

गेली पंचवीस वर्षे या भागातील रस्ता रुंदीकरणाकडे लोकप्रतिनिधींनी डोळेझाक केली आहे. सत्ताधाऱ्यांनी येथील समस्या प्राधान्याने सोडविणे आवश्‍यक आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.-विद्याधर आगरवाडेकर, अध्यक्ष, युवक प्रणीत शिवोली नागरिक संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: डोंगर कापणी वादाचा बळी, जबर मारहाणीत ज्येष्ठाचा मृत्यू; मोरजीसह राज्यात खळबळ

Horoscope: आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; वाचा तुमच्या राशीचे भविष्य!

'पाकिस्तान झिंदाबाद' फलकप्रकरणी हणजूण पोलिसांची मोठी कारवाई, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिस्की पीडिया स्टोअरचे मालक अडचणीत!

Goa Crime: 63 वर्षीय भाडेकरुची निर्घृण हत्या, डोंगर कापणीच्या तक्रारीतून अज्ञातांकडून मारहाण; मोरजीतील धक्कादायक घटना

IND vs SA: दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतची धमाकेदार एंट्री; सोपवली उपकर्णधारपदाची जबाबदारी!

SCROLL FOR NEXT