Siolim MLA Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

Indoor Club Policy: 'बेकायदा पार्ट्यांना लगाम लावा अन् इनडोअर क्लब धोरण आणा'; आमदार दिलायला लोबोंची मागणी

Siolim MLA Delilah Lobo: ध्वनिरोधक म्युझिक प्रणाली असलेले इनडोअर क्लब सुविधा उभारून संगीत वाजवावे किंवा ग्राहकांना हेडफोन उपलब्ध करून द्यावे.

गोमन्तक डिजिटल टीम

ध्वनिरोधक म्युझिक प्रणाली असलेले इनडोअर क्लब सुविधा उभारून संगीत वाजवावे किंवा ग्राहकांना हेडफोन उपलब्ध करून द्यावे. मुळात आम्हांला कुणाचा उदरनिर्वाह हिसकावून घ्यायचा नाही. तसेच संगीत हवे परंतु कानठळ्या बसणारे म्युझिक नको. त्यामुळेच इनडोअर क्लब धोरण आणणे गरजेचे आहे. इतर राज्यांमध्ये हे धोरण आहे. मग पर्यटनक्षेत्र असलेल्या गोव्यात का नको? असा प्रश्न उपस्थित करून शिवोलीच्या आमदार दिलायला यांनी सरकारने इनडोअर क्लब धोरण राबविण्याचा पुनरुच्चार केला.

सध्या बार-रेस्टॉरंटच्या नावाने परवाने घेऊन अनेकजण अनधिकृतपणे क्लब आडून कर्णकर्कश पार्ट्यां वाजवतात. अशा बेकायदा पार्ट्या त्वरित बंद झाल्या पाहिजे, असे मत आमदार दिलायला लोबो यांनी व्यक्त केले.

बार-रेस्टॉरंटना परवानगी देताना, यापुढे पंचायतींनी पार्किंगसाठी पुरेशी जागा आहे की नाही, हे पडताळणी करून परवाने द्यावे. कारण रस्त्यांवरील अव्यवस्थित पार्किंग व वाहतूक कोंडीमुळे बोजवारा उडतो. तसेच स्थानिकांना मानसिक त्रास होतो, याकडे दिलायला यांनी लक्ष वेधले. बुधवारी (ता.२१) दिलायला लोबो या हणजूण येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली. दिलायला म्हणाल्या, ध्वनिप्रदूषणाला माझा नेहमीच विरोध राहील.

पर्यावरण मंत्र्यांनी नुकताच बार्देश उपजिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी नवीन समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष उपजिल्हाधिकाऱ्यांकडून गावात सरप्राईज पाहणीचे निर्देश मंत्र्यांनी त्यांना दिले आहेत. जेणेकरून ध्वनिप्रदूषणावर वचक ठेवता येईल. आस्थापनांत ऑनलाइन ध्वनिनिरीक्षण प्रणाली बसविण्याची गरज आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. सध्या सिकेरी हेलिपॅड व हणजूण पोलीस स्थानकाजवळील डोंगर आणि माळरानावर मिळून दोन ध्वनीनिरीक्षण यंत्रणा उभारल्या आहेत, अशी माहिती दिलायला यांनी दिली.

अर्थव्यवस्थेचा कणा!

गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची राज्यात रेचलेच असते. पर्यटन हा आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे राज्यात पर्यटक आलेच पाहिजे, पण त्यांनी स्थानिकांना गृहीत धरु नये. अनेकदा लेट-नाईट सुरु होणाऱ्या ‍या पार्ट्या दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालतात. याचा त्रास हणजूण, वागातोरमधील स्थानिकांना होतो. त्यांच्या घराच्या खिडक्यांची तावदाने कंपित होतात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत, असेही दिलायला लोबो म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: अडकलेली कामे मार्गी लागणार! 'या' 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राहू ग्रहाची 'युवावस्था' पालटणार नशीब

Shikhar Dhawan: बांगलादेशातील हिंदू महिलेवरील अत्याचारावर संतापला 'गब्बर'; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, "अशी हिंसा सहन केली जाणार नाही!"

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT