Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

Siolim News : शिवोलीचा झपाट्याने होतोय विकास : दिलायला

Siolim News : वेर्ला काणकात भूमिगत वीजवाहिनी कामाचा प्रारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

Siolim News : शिवोली मतदारसंघाचा विकास झपाट्याने होत असून गुरुवारपासून वेर्ला-काणका पंचायत क्षेत्रात सुरू झालेल्या भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामाची सुरुवात त्याचाच भाग असल्याचे शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी सांगितले.

काणका येथील मिल्टन मार्क्स सर्कल परिसरात ११ केव्ही क्षमतेच्या भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर त्या बोलत होत्या.

यावेळी,स्थानिक पंचायतीच्या सरपंच आरती प्रवीण च्यारी, उपसरपंच दिगंबर कळंगुटकर, पंच सदस्य वासुदेव कोरगांवकर, अशोक आर्लेकर, विश्वास आर्लेकर, निकॉल मार्टिन्स, दीपाली बिचोलकर, शिवोली भाजपा मंडळाचे अध्यक्ष मोहन दाभाळे तसेच वरिष्ठ अभियंता सुभाष पार्सेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, या भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकतांना कुठल्याही परिस्थितीत जलवाहिन्या फुटणार नाहीत, याची काळजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी. खात्याचा एक कुशल कामगार नियमितपणे कामावर ठेवावा, अशी सूचना आमदार लोबो यांनी केली.

पंचायत मंडळाने वेळोवेळी कामाची पाहाणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. वेर्ला-काणकाच्या सरपंच आरती च्यारी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. वासुदेव कोरगांवकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Vakri 2025: सावधान! बुध वक्री 'या' राशींसाठी लाभदायक, काहींसाठी चिंतेचा काळ

Goa University: गोवा विद्यापीठाला NAAC कडून A+ ग्रेड! इतिहासात पहिल्यांदाच मिळाला हा मान, CM सावंतांनी केलं अभिनंदन

Goa History: 'राजगो'ला देहांताची शिक्षा फर्मावली, त्याने म्हादईच्या डोहात आंघोळ केली, शिक्षेसाठी तयार झाला; वंदनीय महापुरुष

क्रिडाविश्वात खळबळ! स्टार क्रिकेटपटूच्या पत्नीवर 'हत्येच्या प्रयत्नाचा' गुन्हा दाखल, मुलगीही अडचणीत, पाहा Video

Chatboat: 'चॅटबॉट'शी आपली कायमची गट्टी झाली तर?

SCROLL FOR NEXT