
१८ जुलैपासून बुध ग्रह कर्क राशीत वक्री होणार असून ११ ऑगस्टपर्यंत म्हणजेच पुढील २४ दिवस वक्री मार्गाने भ्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो, तेव्हा तो अधिक प्रभावी आणि काही वेळा उग्रही होतो. मात्र, काही राशींवर त्याचे शुभ परिणामही दिसून येतात.
यंदाच्या बुध वक्रीचा मेष, वृषभ, मीन अशा काही राशींवर सकारात्मक परिणाम होणार असून त्यांना यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळू शकते. मात्र मिथुन, सिंह यांसारख्या पाच राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चला, पाहूया की मेषपासून मीनपर्यंत सर्व १२ राशींवर बुध वक्रीचा कसा परिणाम होणार आहे:
मेष (Aries)
बुध वक्रीच्या काळात करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. कमाईचे नवीन मार्ग खुलतील. वडिलांशी संबंध दृढ होतील. प्रवास शुभ ठरेल. आत्मविश्वास वाढेल. पण विचार न करता गुंतवणूक करू नका.
वृषभ (Taurus)
मन शांत राहील. आर्थिक फायदा होईल. घरात सौहार्द राहील. गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. करिअरमध्ये स्थिरता जाणवेल. निर्णय घेण्याआधी विचार करा.
मिथुन (Gemini)
मानसिक तणाव व उलझण जाणवेल. कायदेशीर अडचणी किंवा अचानक खर्च होऊ शकतो. संभाषणात सावधगिरी बाळगा. आरोग्याकडे लक्ष द्या. वादापासून दूर राहा.
कर्क (Cancer)
भावनिक अस्थिरता जाणवेल. निर्णय घेण्यात अडथळे येऊ शकतात. आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. घाईत निर्णय टाळा.
सिंह (Leo)
मिश्र परिणाम मिळतील. आर्थिक निर्णयात फारच सावध राहा. सामाजिक प्रतिष्ठेवर धोका निर्माण होऊ शकतो. संयमाने बोलणे आवश्यक आहे. क्रोध टाळा.
कन्या (Virgo)
अधिक परिश्रम करावे लागतील पण कमी यश मिळेल. भावंडांशी मतभेद होऊ शकतो. आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल. छोट्या गोष्टी मोठ्या होण्याची शक्यता. धैर्याने वागा.
तूळ (Libra)
शुभ काळाची सुरुवात. आरामदायी जीवनशैली, घरात आनंदाचे वातावरण. करिअरमध्ये सकारात्मक बदल. वाहन किंवा प्रॉपर्टीशी संबंधित कामांमध्ये यश. घरगुती वादात घाई करू नका.
वृश्चिक (Scorpio)
शिक्षण, प्रेमसंबंध व मुलांशी संबंधित गोष्टींत यश मिळेल. पार्टनरशी नाते मजबूत होईल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
धनु (Sagittarius)
मानसिक गोंधळ, छुपे शत्रू, आरोग्याच्या समस्या संभवतात. ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहा. संयम, शिस्त आवश्यक. ध्यान-धारणा लाभदायक ठरेल.
मकर (Capricorn)
प्रोफेशनल व वैयक्तिक जीवनात संधी. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. पार्टनरसोबत चांगली संवाद होईल. समाजात सन्मान वाढेल. अहंकार टाळा. गरजेचे काम पुढे ढकलू नका.
कुंभ (Aquarius)
नोकरीत बदल होण्याची शक्यता. खर्च वाढू शकतात. वाहन विकत घेणे यांसारखा मोठा खर्च होऊ शकतो. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याची काळजी घ्या.
मीन (Pisces)
भाग्याचा भरघोस साथ मिळेल. धार्मिक व आध्यात्मिक प्रगती होईल. प्रवास लाभदायक ठरतील. मन शांत राहील. फक्त आळशीपणामुळे संधी दवडू नका.
बुध वक्री 2025 मध्ये काही राशींसाठी संधींचा काळ आहे तर काहींसाठी सावधगिरी बाळगण्याची गरज. वैदिक ज्योतिषानुसार, आपण जर आपल्या राशीनुसार वागलो, तर बुध वक्रीचा काळ सुसह्य ठरू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.