Sinquerim church tower collapsed due to lightning  Dainik Gomantak
गोवा

सिकेरी-आग्वाद टेकडीवरील ऐतिहासिक सेंट लॉरेन्स चर्चवर कोसळली वीज

वीज कोसळल्याने चर्चच्या बाजूचा एका बुरुज कोसळला

दैनिक गोमन्तक

म्हापसा : गोव्यातील (Goa) सिकेरी - आग्वाद टेकडीवरील ऐतिहासिक सेंट लॉरेन्स चर्चवर (Chruch) वीज कोसळल्याने चर्चचा काही भाग कोसळला आणि चर्चचे अंशतः नुकसान झाले. ही घटना शनिवारी रात्री घडली.

वीज कोसळल्याने चर्चच्या बाजूचा एका बुरुज कोसळला आहे, असे चर्च समितीचे सदस्य लॉरेन्स सिल्वेरा यांनी माध्यमांना सांगितले. बुरुजाचे दगडं मंगलोरी कौलावर पडल्याने छताच्या काही भागाचे नुकसानही झाले आहे. तसेच चर्चच्या आतमधील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले, असल्याची माहिती सिल्वेरा यांनी दिली.

शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी चर्चमध्ये कोणीही उपस्थित नव्हते त्यामुळे सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही. 2005-06 मध्ये, अशीच एक घटना घडली होती आणि त्याच टॉवरवर वीज कोसळली होती. शनिवारच्या रात्री विजेच्या गडगडाटासह गोव्यात वादळी पाऊस कोसळला. आणि राज्यातील काही भागांना या वादळी पावसाचा फटका बसला.

या चर्चचे बांधकाम 1630 मध्ये पोर्तुगीज काळात झाले होते. मांडोवी नदीच्या तोंडाकडे असलेल्या एका निसर्गरम्य ठिकाणी हे चर्च बांधण्यात आले, त्याला 'साओ लुरेंको इग्रेजा एम सिनक्वेरिम' (Sao Lourenco Igreja em Sinquerim) म्हणून ओळखले जाते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) जुन्या गोव्याच्या जागतिक वारसा संकुलात शतकानुशतके जुन्या स्मारकांमध्ये अतिरिक्त विद्युल्लता संरक्षण यंत्रणा बसवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Jersey Stolen: BCCI च्या ऑफिसमध्ये 6.52 लाखांची चोरी; मुंबई, चेन्नईसह अनेक IPL संघांच्या जर्सी गायब, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

SCROLL FOR NEXT