Shankar Mahadevan in Purple Festival Dainik Gomantak
गोवा

Shankar Mahadevan in Purple Festival : या या मया या..... शंकर महादेवन यांनी धरला गाण्यावर ठेका

आपल्या गोवा दौऱ्यात शंकर महादेवन यांनी गोव्यात सुरु असलेल्या पर्पल फेस्टिव्हलला भेट दिली.

आदित्य जोशी

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन सध्या गोव्यात आहेत. आपल्या गोवा दौऱ्यात शंकर महादेवन यांनी गोव्यात सुरु असलेल्या पर्पल फेस्टिव्हलला भेट दिली. यावेळी दिव्यांग मुलांसोबत वेळ घालवत त्यांनी मुलांच्या कलागुणांचं कौतुकही केलं. यावेळी शंकर महादेवन यांनी विशेष मुलांसोबत गाण्यावर ठेका धरला. याचा व्हिडीओ शंकर महादेवन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

पर्पल फेस्टिव्हलमध्ये काल विशेष मुलांचं नृत्य सादरीकरण सुरु होतं. या या मया या या कोकणी गाण्यावर विशेष मुलांचं नृत्य सुरु होतं. मात्र मुलांचं नृत्य पाहून शंकर महादेवन स्वत:ला रोखू शकले नाहीत. त्यांनीही या विशेष मुलांच्या तालात ताल मिळवत गाण्यावर ठेका धरला. विशेष म्हणजे महादेवन यांनी यावेळी या विशेष मुलांना सॅल्युट करण्यासाठी खास पर्पल म्हणजेच जांभळ्या रंगाचं जॅकेटही परिधान केलं होतं.

दरम्यान देशातला पहिला विविधतेचा तसेच सर्वसमावेशकतेचा सोहळा म्हणून उत्सुकता लागलेल्या पर्पल फेस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात कालपासून सुरुवात झाली. आयनॉक्स परिसरात झालेल्या उद्‌घाटन सोहळ्यास गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याला प्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांनीही उपस्थिती लावली होती.

पर्पल फेस्ट सोहळ्यादरम्यान शंकर महादेवन यांनी आपले विचार मांडले. महादेवन म्हणाले,  संगीतप्रेमी विद्यार्थ्यांसाठी गोव्यात संगीत शिकण्यासाठी योग्य सुविधा नाहीत, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येऊन संगीत शिकू शकतील अशा सुविधा असणं हे महत्वाचं आहे. अशा दर्जेदार सुविधा असणं फार गरजेचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahavatar Narasimha: ‘महावतार नरसिंह’ची गर्जना! एका दिवसात कमावले 'इतके' कोटी; विक्रमी कलेक्शनकडे वाटचाल

Accident in Goa: कुंडई औद्योगिक वसाहतीत अपघात; छत दुरुस्ती करताना कामगाराचा मृत्यू!

Goa Crime: प्रेमाचा त्रिकोण! सांगोल्डात युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; प्रियकरासोबत-प्रेयसी फरार

Goa Live Updates: चेन्नई-तामिळनाडू येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विभागीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोवा महिला संघ उपविजेता

IND vs ENG: लाईव्ह मॅचमध्ये रवींद्र जडेजा संतापला, अचानक थांबला खेळ; नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT